वाढलेल्या पोटामुळे व्यक्तीमत्व बिघडून जाते. त्यामुळे अनेकजण पोटाची चरबी (Belly fat) कमी करण्यासाठी जीममध्ये घाम गाळतात, अथवा सकाळी चालण्याचा, धावण्याचा व्यायाम करतात. परंतु, हे उपाय पुरेसे नसून यासाठी आहार सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे. यामुळेच जीमला जाऊनही अनेकांचे पोट कमी होत नाही.

कॅलरीज आणि फॅट याचा विचार करून पदार्थ खाल्‍ले तरच जीमचा फायदा होऊ शकतो. एक पदार्थ असा आहे, ज्याच्या सेवनाने तुम्ही पोट सहज कमी करू शकता. सकाळी आठ वाजण्यापूर्वी हा पदार्थ खावा. याविषयी आपण अधिक माहिती घेणार आहोत.

नक्की वाचा


तो पदार्थ आहे अंडे

1) सकाळी ८ वाजण्‍यापूर्वी २ उकडलेली अंडी खाल्‍ली तर पोट फ्लॅट होऊ शकते. कारण अंड्यामध्‍ये फॅट अजिबात नसते. ते प्रोटीनयुक्त असते. यामुळे वजन वाढत नाही.

2) अंडे हिरव्‍या पालेभाज्‍यासोबतही खाता येते. अन्‍यथा उकडलेले अंडे ऑलीव्‍ह ऑइलमध्‍ये फ्राय करुन किंवा व्‍हीट ब्रेडसोबतही खाऊ शकता.

3) ब्रेकफास्‍ट मध्‍ये अंडी खाल्‍ल्‍याने दीर्घकाळ पोट भरल्‍यासारखे वाटते. यामुळे वारंवार भूक लागणार नाही.

4) अंड्याचा पिवळा भाग बिनधास्त खा. यामुळे काहीही नुकसान होत नाही. मात्र कॉलेस्ट्रॉलची समस्‍या असेल तर डॉक्‍टरांचा सल्‍ला अवश्‍य घ्‍यावा.