potato face pack get glow white skin

बटाटा (Potato) हा नेहमी भाजी आणि खाण्याचे पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. मात्र या बटाट्यापासून तुम्ही तुमचा चेहरा मुलायम बनवू शकता. बटाटा हा चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी मदत करतो. आणि बटाट्यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या ही कमी होतात. मात्र यासोबतच चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी आणि सुरकुत्या कमी करण्यासाठीही बटाट्याचा वापर होतो. त्यामुळे तुम्ही जर बटाट्याचा वापर केला तर तुमचा चेहरा मुलायम होण्यास मदत होईल.

नक्की वाचा

१) उन्हामुळे तुमची त्वचा काळवंडली गेली असेल तर एका बटाट्याचा रस काढून त्यात एक चमचा अंड्याचा सफेद भाग आणि एक चमचा दही टाका. हे मिक्सरमध्ये वाटून चेहऱ्यावर लावा. २० मिनिटांनी चेहरा धुवून घ्या.

२) तुमच्या डोळ्यांखाली काळी वर्तुळे आल्यास कच्चा बटाटा कापून फ्रीजरमध्ये ठेवून थंड करा. आणि दोन्ही डोळ्यांवर २० मिनिटे ठेवा. यामुळे डार्क सर्कल कमी होण्यास मदत होईल.

३) चेहरा उजळवण्यासाठी बटाट्याच्या रसात चिमूटभर हळद मिसळून हे मिश्रण चेहरा आणि मानेवर लावा. ३० मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने धुवा.

४) जर तुमची स्किन कोरडी असेल तर चेहऱ्यावर दही आणि बटाट्याचा फेसपॅक लावा. यासाठी २ ते ३ चमचे बटाट्याचा रस आणि एक चमचा दही मिसळून चेहऱ्यावर लावा. १५ मिनिटांनी चेहरा धुवा.