फुफ्फुसातील (lungs) संसर्गाला न्यूमोनिया असे म्हटले जाते. बहुतेक प्रकरणांमध्ये हे संक्रमण बॅक्टेरियाद्वारे होते. या आजारामध्ये फुफ्फुसांच्या एका किंवा दोन्ही भागांमध्ये सूज येते आणि फुफ्फुसांमध्ये पाणीदेखील भरते.

नक्की वाचा

न्यूमोनियाची कारणे कोणती आहेत

न्यूमोनिया(World Pneumonia Day) हा न्यूमोकोकस, हेमोफिलस, लेजिओनेला, मायकोप्लाज्मा, क्लेमाइडिया आणि स्यूडोमोनससारख्या जीवाणूमुळे होतो. याव्यतिरिक्त, बरेच व्हायरस (जे इन्फ्लूएन्झा आणि स्वाइन फ्लूचे वाहक आहेत), बुरशी आणि परजीवी सूक्ष्मजंतूमुळेदेखील न्यूमोनिया होऊ शकतो. भारतात संसर्गजन्य रोगांमुळे होणाऱ्या मृत्यूंपैकी सुमारे 20 टक्के  मृत्यू न्यूमोनियामुळे होतात. या तिरिक्त हा आजार हॉस्पिटलच्या संसर्गजन्य आजारांमध्ये दुसर्‍या क्रमांकावर आहे.

यांना असतो अधिक धोका

तसे तर हे संक्रमण कोणालाही होऊ शकते, परंतु काही रोग आणि परिस्थिती अशी असते, ज्यात न्यूमोनिया होण्याचा धोका जास्त असतो. जसे की दारू आणि मादक पदार्थांचे व्यसन, डायलिसिसवरील रुग्ण, हृदय, फुफ्फुस आणि लिव्हरच्या रोगांची गंभीर प्रकरणे. त्याचप्रमाणे मधुमेह, किडनीचा गंभीर आजार, म्हातारपण, लहान मुले आणि नवजात बाळ, कॅन्सर आणि एड्सच्या रुग्णांनाही न्यूमोनियाचा धोका असतो. यामागील कारण म्हणजे आधीच कोणत्याही गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांची रोगप्रतिकारशक्ती खूप कमकुवत असते.

न्यूमोनिया संसर्ग तीन प्रकारे होऊ शकतो

1) श्वसन मार्गाने : खोकला किंवा शिंकण्याद्वारे.
2) रक्तवाहिन्यांच्या मार्फत : डायलिसिसमुळे रुग्णालयात रुग्ण जे बर्‍याच काळापासून इंट्रा-व्हेनस फ्लूइडवर आहेत किंवा हृदयरोगी, ज्यांमध्ये पेस मेकर असते.
3) एसपिरेशन: खाद्यपदार्थ श्वसननलिकेत जाण्याला एसपिरेशन म्हणतात.

त्याची लक्षणे कोणती आहेत

– सांधेदुखीसह तीव्र ताप
– खोकला आणि थुंकी (ज्यामध्ये कधी कधी रक्तदेखील येऊ शकते)
– छातीत दुखणे आणि दम लागणे
– काही रुग्णांमध्ये अतिसार, मळमळ आणि उलटी येणे यांसारखे लक्षणं दिसू शकतात.
– चक्कर येणे, भूतपासणी क न लागणे, स्नायूंचे दुखणे, थंडी वाजणे, डोकेदुखी आणि त्वचा निळसर पडणे इ.

न्यूमोनियाची कशी केली जाते

रक्त तपासणी म्हणजेच ब्लड टेस्ट, छातीचा एक्स-रे, श्लेष्मामध्ये ग्राम स्टेन व कल्चरची तपासणी व एबीजी चाचणी इ. याव्यतिरिक्त, रक्ताची कल्चर तपासणीदेखील केली जाते.

गंभीर स्थितीची लक्षणे

अशी काही लक्षणे आहेत ज्यामुळे न्यूमोनिया झालेल्या व्यक्तीस आयसीयूमध्ये दाखल केले जाऊ शकते.
– कमी रक्तदाब
– हात पाय थंड पडणे
– श्वास घेण्याचा दर प्रति मिनीट 30 पेक्षा जास्त होणे
– गोंधळ उडणे
– पांढऱ्या रक्त पेशींची संख्या 4,000 पेक्षा कमी होणे


टीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अ‍ॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अ‍ॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.