एनर्जी ड्रिंकच्या जहिारातील मधील हिरोची तुफानी एनर्जी पाहून तुम्हालाही वाटू शकते की आपणही एनर्जी ड्रिंक (Energy drink) घेतले तर काही तरी तुफानी करू शकतो. मात्र, हे खरं नाही. सत्य हे आहे की एनर्जी ड्रिंक्स शरीरासाठी नुकसानकारक असतात. शिवाय त्यास सॉफ्ट ड्रिंक म्हणणे सुद्धा चूकीचे आहे. तज्ज्ञ सांगतात, हाय एनर्जी ड्रिंक कॅनमध्ये १३ चमचे साखर, दोन कप कॉफीएवढे कॅफीन असते. यामुळे मेंदूला धोका निर्माण होऊ शकतो. काहीजण ३ ते ४ कॅन एनर्जी ड्रिंक रोज घेतात. यामध्ये सुमारे ६४० मिलिग्रॅम कॅफीन असते. एखादी प्रौढ व्यक्ती दिवसातून केवळ ४०० मिलिग्रॅम कॅफीन पचवू शकते.

नक्की वाचा

अमेरिकेत करण्यात एका संशोधनानुसार जास्त प्रमाणात कॅफीन सेवन केल्याने हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. तसेच मृत्यूदेखील ओढावू शकतो. आणखी एका संशोधनात असे आढळून आले आहे की, साधे पाणी हे एनर्जी ड्रिंकच्या तुलनेत उत्तम असते. तत्काळ ऊर्जा मिळवण्यासाठी फळे, फळांचा रस किंवा नाष्टा करणे हा चांगला मार्ग आहे. मुले नाष्टा करण्याऐवजी एनर्जी ड्रिंक घेतात. यामुळे ते जास्त चिडचीड करू शकतात. त्यांची एकाग्रता कमी होऊ शकते.