Curry leaves

भारतीय जेवणात वापरल्या जाणा-या सगळ्याच पदार्थात औषधी (Medicine) गुणधर्म आहेत. हे पदार्थ जेव्हा शरीरात जातात तेव्हा ते एक प्रकारे औषधाचे काम करतात. त्यापैकीच एक म्हणजे कढीपत्ता (Curry leaves) आहे. त्यामुळे जेव्हाही तुमच्या ताटात कढीपत्ता येईल. त्याला बाजूला करू नका. त्याच्यातील असंख्य गुणांमुळे तो अनेक आजारांवर रोगावर नियंत्रण   ठेवण्यास मदत करतो. त्यामुळे तो आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरला आहे.

नक्की वाचा

कढीपत्याने कढी आणि आमटी चविष्ट बनते यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे कढीपत्ता आरोग्यदायीदेखील आहे. त्यामुळे 100 ग्रॅम कढीपत्याच्या पानात 66.3 टक्के आर्द्रता, 6.1 टक्के प्रोटीन, 1 टक्का चरबी, 16 टक्के कार्बोहाइड्रेट, 6.4 टक्के फायबर आणि 4.2 टक्के खनिज आढळते. कढीपत्ता सेवन केल्याने अनेक फायदे होतात. कढीपत्ता खाल्ल्याने कोलेस्ट्राॅलवर नियंत्रण राहते. तसेच नियमित कढीपत्ता खाल्ल्याने पचनक्रिया व्यवस्थित राहते. तसेच लठ्ठपणा कमी होतो. तसेच मधुमेही रुग्णांनी सतत तीन महिने रोज सकाळी कढीपत्ता खाल्ल्यास त्याचा फायदा होण्यास मदत होतो. तसेच केस गळत असल्यास आहारात कढीपत्याचा समावेश करावा. पोटातील रोगांवर मात करण्यासाठी ताकात कढीपत्ता घालून पिण्याने आराम मिळतो किंवा कढीपत्याचा रस काढून त्यात लिंबू पिळून थोडीसी साखर मिसळून सेवन केल्यास फायदा होतो.

कोणत्याही पदार्थाला फोडणी देताना कढीपत्ता वापरावा. ज्याने पोटातील रोगांना आराम मिळतो. याशिवाय कढीपत्याचे अनेक फायदे आहेत. कढीपत्याने काचबिंदूसारखे रोग दूर होऊ शकतात. डोकेदुखीवरदेखील त्याची पाने लाभदायक ठरतात. तसेच कढीपत्ता कफ बाहेर काढण्यास मदत करतो. कढीपत्याच्या पावडरमध्ये 2-3 थेंब आणि थोडीसी साखर मिसळून खाल्याने उल्टीचा त्रास नाहीसा होतो. अशा प्रकारे केवळ पोटाच्या आजावर नाही तर अनेक आजारांवर गुणकारी आहे. त्याचे नियमित सेवन करावे.