थंड हवामान वाढू लागले आहे. यामुळे सर्दी, खोकला आणि तापासारख्या समस्या देखील वाढू लागल्या आहेत. यावर वाफ घेणे हा चांगला उपाय आहे. वाफ घेतल्याने अनेक फायदे होतात. इतकेच नव्हे, वाफ घेतल्याने शरीराचे तापमान वाढते, ज्यामुळे रक्त वाहिण्या प्रसरण पावतात आणि रक्ताभिसरण चांगले होते. वाफ कशी घ्यावी, त्याची पद्धत कोणती, फायदे आणि खबरदारी याबाबत माहिती घेवूयात.

नक्की वाचा

अशी घ्या वाफ :

एक भांड्यात पाणी घेऊन ते भरपूर गरम करा. वाफ घेण्यासाठी वाफेच्या मशीनचा सुद्धा वापर करू शकता. पाणी चांगले गरम झाल्यानंतर भांड्याच्यावर आपला चेहरा 30 सेंटीमीटर अंतरावर ठेवा. डोक्यावरून टॉवेल व्यवस्थित झाकून घ्या आणि मोठा श्वास घेत वाफ आत घ्या. 5-10 मिनिटे वाफ घ्या. यामुळे सर्दी, खोकला, तापात आराम मिळेल.

वाफ घेण्याचे फायदे

1. सर्दी, ताप आणि कफावर परिणामकारक आहे.
2. अस्थमाच्या रूग्णांना श्वास सहज घेण्यास मदत होते. छातीतील कफ साफ होतो.
3. घशातील खवखव, सूज दूर होते.

ही खबरदारी घ्या

1) वाफ घेताना डोळ्यात जळजळ किंवा कोणताही त्रास होत असेल तर टॉवेल ताबडतोब बाजूला करा आणि वाफ घेऊ नका.
2) सदी, ताप, खोकल्यातून आराम मिळाला असेल तर जास्त वाफ घेऊ नका.
3) मुले, गरोदर महिला आणि अस्थमाचे रूग्ण यांना वाफ देताना सावधगिरी बाळगावी.