आपल्या घरात देखील मुंग्या (Ants) निघत असल्यास तर हे आपल्या जीवनात घडणाऱ्या घटनांकडे लक्ष केंद्रित करतं. घरात निघणाऱ्या मुंग्यांना आपण सहजच घेत असतो. पण हे आपल्याला भविष्याच्या घटणाऱ्या घटनांबद्दल काही न काही संकेत देत असतात.मुंग्या वरील दिशेला जात असल्यास किंवा खाली जात असल्यास या व्यतिरिक्त आपल्या घरात येणाऱ्या मुंग्यांना काही खायला मिळत आहे. किंवा नाही हे देखील बऱ्याच घटनांवर केंद्रित केलं जात.लाल मुंग्या आणि काळ्या मुंग्या वेग वेगळ्या गोष्टींचे संकेत देतात. जर आपल्या घरात काळ्या मुंग्या येत आहेत तर त्या सौख्य आणि ऐश्वर्य येण्याचे संकेत देतात.

नक्की वाचा

काळ्या मुंग्यांचा प्रभाव-


काळ्या मुंग्या घरात दिसूनच येतात. बऱ्याच वेळा लोकं काळ्या मुंग्यांना साखर, गव्हाचं पीठ सारखे पदार्थ खाण्यासाठी देतात. काळ्या मुंग्यांना खाऊ घालणं शुभ असतं जर तांदुळाच्या डब्यातून मुंग्या निघत असल्यास हे शुभ संकेत असतं. थोड्याच दिवसात आपल्याला पैश्यात बढती होण्याचे दिसून येईल, माणसाची आर्थिक स्थिती चांगली होईल. काळ्या मुंग्या सौख्य आणि भौतिक संसाधनाच्या गोष्टीसाठी शुभ मानल्या आहे.लाल मुंग्या दिसत असल्यास तर सावधगिरी बाळगाजर आपल्या घरात लाल मुंग्या होत असल्यास तर हे अशुभ संकेत असतं. 


भविष्याच्या त्रासाला, मतभेदाला, पैसे खर्च होण्याचे संकेत दाखवणारे असतं. जर लाल मुंग्या आपल्या घरात येत असल्यास तर काही अशुभ घडू शकतं. पण जर लाल मुंग्या तोंडात अंडी घेऊन जाताना दिसत असल्यास हे शुभ संकेत असतं. मुंग्यांना खाण्यासाठी खाद्य पदार्थ टाकावे. आपल्या घरात मुंग्या उपाशी राहत असल्यास हे अशुभ संकेत आहे.


या दिशेतून येणाऱ्या मुंग्या शुभ -


काही ठराविक दिशेतून मुंग्या येत असल्यास हे आपल्यासाठी शुभ संकेत असू शकतात. वास्तविक काळ्या मुंग्या आपल्या घरात उत्तर दिशेने येत असल्यास हे आपल्यासाठी शुभ असू शकतं. दक्षिण दिशेने येत असलेल्या मुंग्या देखील फायदेशीर असतात. पूर्वीकडून येणाऱ्या मुंग्या सकारात्मक सूचना घेऊन येतात. पश्चिमेकडून येणाऱ्या मुंग्या बाहेरच्या प्रवासाचे योग घेऊन येतात.