Morning Helath Tips

स्वत: ला निरोगी (Health) ठेवण्यासाठी बरेच जण सकाळी रिकाम्या पोटी (Empty Stomach) फळं (Fruits) खातात. तर काही लोक सकाळच्या नाश्त्यात धान्य (Sprouted Grains), ड्रायफ्रुटचा समावेश करतात. पण रिकाम्या पोटी अशा काही गोष्टी आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात. आम्ही तुम्हाला अशाच काही पदार्थांबद्दल सांगणार आहोत जे रिकाम्या पोटी खाल्ल्याने पचनावर वाईट परिणाम होतो. यामुळे मोठ्या आजारांचाही धोका असतो.

नक्की वाचा

रिकाम्या पोटी पेरू खाऊ नका

जर पाचक शक्ती कमकुवत असेल तर पेरू खाण्याचं शक्यतो टाळा. म्हणजेच जास्त सेवन केल्याने गॅसचा त्रास होऊ शकतो. म्हणून रिकाम्या पोटी पेरू खाऊ नये. हिवाळ्यामध्ये तुम्ही रिकाम्या पोटी खाल्ल्यास पोटदुखीसारखी समस्या उद्भवू शकतात.

टोमॅटोमुळे होऊ शकतं नुकसान

टोमॅटोमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन सी असतं. त्याचा उष्ण परिणाम होतो. बरेच लोक सकाळी रिकाम्या पोटी टोमॅटो खाणं पसंत करतात. पण रिकाम्या पोटी टोमॅटो खाणं शरीरासाठी धोक्याचं आहेत.

आंबट फळं टाळा

सकाळी फळं खाण्याचा सल्ला दिला जातो. पण सकाळी रिकाम्या पोटी लिंबू आणि फायबरयुक्त फळं खाणं टाळलं पाहिजे. त्याचा पाचन तंत्रावर वाईट परिणाम होतो.

रिकाम्या पोटी चहा पिणं टाळा

रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफी पिणं टाळा. खासकरून ते लोक ज्यांना अॅसिडिटीचा त्रास आहे.

(महत्त्वाचं : वरील माहिती ही सामान्य माहितीवर आधारित आहे. आपण आहाराबद्दल तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या)