हृदयरोग (Heart Disease) हे केवळ जास्त वयाच्या लोकांना होतात, असे पूर्वी समजले जात होते. पण आता तरुणाई सुद्धा हृदयरोगांना बळी पडत आहे. आधुनिक जीवनशैलीमध्ये तरूणांमध्ये हा धोका वाढला आहे. तसेच तणाव, सतत काम करणे, अपुरी झोप, धुम्रपान, मद्यपान, आदी कारणामुळे तरुणांना हार्ट अटॅकचा धोका वाढला आहे. हृदय विकाराचा झटका येत असताना घाम येणे, चक्कर येणे, मळमळ होणे आणि श्वास घेण्यास त्रास होणे या समस्या होतात.

नक्की वाचा

ही आहेत लक्षणे

1) छातीत वेदना हे सामान्य लक्षण आहे.
2) अपचनाची समस्या होते.
3) जडपणा आणि अस्वस्थ वाटू लागते.
4) छातीतील वेदनानंतर काखेत, मानेत आणि पोटपर्यंत होतात.
5) हृदयाचे ठोके वाढतात.
6) श्वास घेण्यास त्रास होणे.

या लोकांना अधिक धोका

1) राग, चिडचिड करणारे
2) डिप्रेशनग्रस्त लोक
3) जास्त तणावाखाली असणारे