Vitamin-C's

व्हिटॅमिन ‘सी’ (Vitamin C) किंवा एस्कॉर्बिक ॲसिड, एक अँटी-ऑक्सिडेंट आहे, जे शरीराला स्कर्वीपासून संरक्षण करण्यास मदत करते. कोलेजेन नावाची प्रथिने तयार करण्यासाठी ही महत्त्वपूर्ण भूमिका निभावते. हाडे, रक्तवाहिन्या आणि शरीराच्या ऊतींना स्थिरता मिळते. जेव्हा शरीरात कमतरता भासते, तेव्हा अशक्तपणा, थकवा, कधीकधी हिरड्या आणि दातांच्या समस्या आणि शरीर दुखणे अशा समस्या जाणवू लागतात.

दररोज किती व्हिटॅमिन सी खाणे आवश्यक

१) लहान मुलांसाठी- ४०-४५ ग्रॅम
२) वय १४ ते १८ वर्षे -७५ ग्रॅम
३) अधिक वयोगटातील -९०ग्रॅम
४) गर्भवती- ८५ ग्रॅम
५) स्तनपान करणाऱ्या महिलांसाठी -१२० ग्रॅम

व्हिटॅमिन सीची कमतरता असल्याची अनेक लक्षणे आहेत-


१) थकवा आणि अशक्तपणा जाणवतो.
२) त्वचेवर डाग दिसतात.
३) नाक वाहणे
४) सांधे दुखी आणि सूज
५) हिरड्या आणि दात रक्तस्त्राव
६) अशक्तपणा
७) केस कोरडे आणि गळून पडणे
८) अचानक वजन वाढणे किंवा कमी होणे
९) त्वचा कोरडी होणे
१०) वारंवार संसर्ग होणे

चला आता आम्ही तुम्हाला अशाच काही फळांबद्दल सांगणार आहोत. ज्यामुळे आपण शरीरातील व्हिटॅमिन सी ची कमतरता तुम्ही पूर्ण करू शकता.

नक्की वाचा

1) घरीच बनवा ‘एलोवेरा जेल’, अशी आहे पद्धत; स्‍वस्‍तात मिळवा सुंदर त्‍वचा

१) लिंबू

लिंबू हे व्हिटॅमिन सी चा उत्तम स्रोत आहे. आपण रोजच्या नित्यक्रमात लिंबू पाणी किंवा त्यापासून बनवलेल्या गोष्टी समाविष्ट करू शकता.

२) संत्री

संत्रीपासून देखील व्हिटॅमिन सी मिळते. संत्रीमुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते. अनेक रोगांपासून संरक्षण करण्यास मदत करतो.

३) आवळा

आवळयांमध्ये तीन संत्र्याइतके व्हिटॅमिन सी असते. जर आपण दररोज फक्त दोन आवळे खाल्ले तर शरीरात व्हिटॅमिन सी ची कमतरता कधीच येणार नाही. तुम्ही ते मुरब्बा किंवा चटणी बनवून खाऊ शकता.

४) शिमला मिरची

शिमला मिरचीमध्ये अँटीऑक्सिडेंट्स बरोबरच व्हिटॅमिन सी देखील भरपूर प्रमाणात आढळते. यामुळे तणाव दूर होतो आणि कोलेस्टेरॉल देखील नियंत्रणात राहतो.

५) द्राक्षे

द्राक्षांमध्ये भरपूर कॅलरी, फायबर तसेच व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमीन के असते. त्याचे सेवन केवळ आरोग्यासाठीच नव्हे तर त्वचेसाठीही खूप फायदेशीर आहे.

६) ब्रोकोली

ब्रोकोलीचे सेवन केवळ व्हिटॅमिन-सीची कमतरताच पूर्ण करत नाही, तर कर्करोगाचा धोका देखील कमी करते. १ कप ब्रोकोलीमध्ये १३२ मिलीग्राम व्हिटॅमिन-सी असते.

७) अननस

अननसामध्ये ७८.९ मिलीग्राम व्हिटॅमिन-सी आणि ब्रोमेलेन नावाचे सजीवांच्या शरीरात निर्माण होणारे द्रव्य असते, जे शरीरास विषाणूच्या संसर्गाच्या जोखमीपासून वाचविण्यास मदत करते.

८) किवी

किवि हे व्हिटॅमिन-सी १३८.४ मिलीग्रामसह पोटॅशियम, तांबे आणि लोहच्या गुणधर्मसहित समृद्ध आहे. दररोज सेवन केल्यास आपणास स्कर्वी आजारांपासून वाचवते. तसेच हे शरीरातील पेशी कमी करत नाही.

९) पपई

पपईच्या १ कापात ८८.३ मिलीग्राम व्हिटॅमिन-सी असते. आरोग्याचा अनेक समस्यांसाठी याचा रामबाण उपाय आहे, तर चेहऱ्यावर लावल्याने सौंदर्यविषयक समस्यांही दूर होतात.

१०) मुनका

मुनुक्यांमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी आढळते. हे त्वचा, श्वास घेण्याच्या समस्या आणि संसर्गच्या समस्या दूर ठेवण्यास मदत करते. रिकाम्या पोटी मनुके खाल्ल्याने डोळ्यांची चमक वाढते.

११) स्ट्रॉबेरी

स्ट्रॉबेरीमध्ये ८४.७ मिलीग्राम व्हिटॅमिन-सी असते. स्ट्रॉबेरीचे सेवन त्वचा आणि दातांसाठी चांगले आहे. याशिवाय तुम्ही अनेक आरोग्यविषयक समस्या दूर करू शकता.

१२) राजगिरा

खनिजयुक्त राजगिराचे सेवन हिवाळ्यामध्ये फायदेशीर असते. तसेच त्याचे सेवन केल्याने पोट निरोगी राहते.

१३) गुळाचे दूध

दररोज रात्री दुधामध्ये गूळ मिसळल्याने शरीरात व्हिटॅमिन सी ची कमतरता कमी होते. याशिवाय, ही रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते.

१४) ब्रुसेल्स स्प्राउट्स

अर्ध्या कप शिजवलेल्या ब्रुसेल्स स्प्राउट्समध्ये ४८ मिलीग्राम व्हिटॅमिन सी असते, जे आपल्याला बर्‍याच आजारांपासून वाचविण्यास मदत करते.