Beard

र्वत्र बिअर्ड (Beard) लुक ठेवणारे अनेकजण दिसत आहेत. तरुणांना बिअर्ड ठेवायाला फार आवडते असे दिसत आहे. काहींना बिअर्ड आवडतही नाही. काहींना दाढी नीट येत नाही असाही काहींचा प्रॉब्लेम आहे. दाढीचे केस वाढवण्याच्या काही अफलातून टीप्स आज आपण पाहणार आहोत.

नक्की वाचा

1) दालचीनी

तुम्हाला माहीत नसेल पंरतु दालचीनी केस वाढवण्यासाठी खूप फायदेशीर आहे. दालचीनीची पावडर आणि लिंबाचा रस घेऊन एक पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. 15 मिनिटांनी थंड पाण्याने चेहरा धुवून टाका. जर चेहऱ्याला लिंबाची अॅलर्जी असेल तर लिंबू वापरू नका. अन्यथा चेहऱ्याची जळजळ होऊ शकते.

2) खोबरेल तेल 

कडीपत्त्याची पाने खोबऱ्याच्या तेलात टाकून उकळू घ्या. हे तेल जेव्हा थंड होईल तेव्हा त्या तेलाने दाढीची मालिश करा. अजून एक म्हणजे आवळा पावडर आणि खोबरेल तेल यांचे मिश्रण करा. 2 मिनिट हे उकळून घ्या. थंड झाल्यावर दाढीची मालिश करा. लक्षात असू द्या की, आवळ्याचं प्रमाण 25 टक्केच असावं.

3) आवळा

जर तुमच्या दाढीच्या केसांची वाढ होत नसेल तर, आवळ्याच्या तेलाने दाढीची मालिश करा. रोज 20 मिनिटे मालिश केल्याने तुम्हाला फायदे मिळू शकतात. मालिश केल्यानंतर चेहरा धुवून टाका. शक्य असल्यास आवळ्याच्या तेलात राईची काही पाने टाकून एक पेस्ट तयार करा. हे दाढीवर लावा. 20 मिनिटांनी चेहरा धुवून टाका.

4) व्हिटॅमिन्सचं सेवन

तुम्हाला माहिती नसेल परंतु जास्त प्रोटीनयुक्त पदार्थ खाल्ल्याने दाढीची वाढ वेगाने होते. केस वाढवण्यासाठीचे पौष्टीक घटक प्रोटीनमध्ये जास्त असतात. तुम्ही तुमच्या ब्युटी प्रॉडक्टमध्ये व्हिटॅमिन बी चा समावेशही करू शकता.