Why hair falls out

केस गळती सामान्य समस्या असून त्याची अनेक कारणे असतात. यामध्ये आजार (Illness) , जेनेटिक कारणांचा समावेश आहे. केस गळण्याच्या पाच कारणांविषयी आणि त्यावरील सोप्या उपायांविषयी माहिती घेतली तर तुमचे केस कधीही गळणार नाहीत. रक्तामध्ये आयर्न कमी असल्याचा परिणाम केसांवर होतो. यामुळे केस गळतात. थायरॉइड प्रॉब्लेममुळे बॉडीमधील हार्मोन डिस्टर्ब होतात आणि केस गळू शकतात.

तसेच आहारामध्ये व्हिटॅमिन्स, मिनरल्स, प्रोटीनच्या कमतरतेने केस कमजोर होऊन गळतात. जास्त औषधे घेणे किंवा कीमोथेरपीसारख्या उपचारांमुळे केसांची मुळे कमजोर होतात. मानसिक तणावामुळे केसांच्या मुळांमध्ये कमजोरी येते. यामुळे केस गळतात. अशा कारणांमुळे होणारी केस गळती थांबवायची असल्यास योगा आणि मेडिटेशन करावे. योगा, प्राणायाम, व्यायामाच्या माध्यमातून रक्ताभिसरण क्रिया सुधारता येते. ताण आणि तणाव कमी होतो. त्यामुळे केस गळत नाहीत.

नक्की वाचा

1) घरीच बनवा ‘एलोवेरा जेल’, अशी आहे पद्धत; स्‍वस्‍तात मिळवा सुंदर त्‍वचा
दारू, सिगारेट, उशिरापर्यंत जागणे, तणावासारख्या गोष्टी टाळा. यामुळे शरीर सशक्त राहते. केस गळती कमी होते. जंक फूड, तेलकट, तुपकट पदार्थ टाळा. त्याऐवजी फळे, हिरव्या पालेभाज्या, सुकामेवा, अंडी, दूध यांसारखे पदार्थ खा. केसांची वाढ चांगली होते. जास्त गरम पाण्याने अंघोळ करणे, केस वाळवण्यासाठी मशीनचा जास्त वापर केल्याने केसांची मुळे कमजोर होऊ शकतात. केमिकल असलेला शाम्पू आणि कलर्सऐवजी नैसर्गिक सौंदर्य प्रसाधनांचा वापर करावा.