Loneliness can increase the risk of stroke

नोकरी, शिक्षण वा अन्य कारणांमुळे काहींना एकटे राहण्याची वेळ येते. असे एकाकी (Lonely) राहणे व्यक्तीला दुर्मुख तर बनवितेच पण अनेक आजारांचे मूळसुद्धा ठरू शकते, असे एका ताज्या अध्ययनातून समोर आले आहे. एकटे व समाजापासून दूर राहणे ह्रदयाचे विकार व स्ट्रोकचा धोका यांसारखे खतरनाक आजारांना आमंत्रण देऊ शकते.

नक्की वाचा

एकाकी राहण्याचा रोगप्रतिकारकशक्ती, रक्तदाब आणि अकाली मृत्यू यांसारख्या धोक्याशाी संबंध असतो, यासंबंधीचे पुरावे यापूर्वीच्या अध्यनातून आधीच मिळाले आाहे. मात्र त्यामुळे ह्रदयाचे विकार व स्ट्रोकची जोखीम यावर किती प्रभाव पडू शकतो, हे स्पष्ट होऊ शकले नव्हते. युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्कच्या शास्त्रज्ञंनी हे अध्ययन केले असून त्यात त्यांना तब्बल १.८१ लाख लोकांना समाविष्ट करून घेतले होते.

या आकडेवारीच्या विश्लेषणातून असे दिसून आले की, ह्रदयाच्या आजारांच्या धोक्याचा २९ टक्के संबंध एकटेपण व सामाजिक तुटकपणासोबत असतो. तर स्ट्रोकच्या धोक्याचा त्याच्याशी ३२ टक्के संबंध असतो. एकाकीपण व सामाजिक तुटकपणाची समस्या दूर केल्यास जास्त उत्पन्न असलेल्या देशांत आढळून येणाऱ्या चिंता व तणावपूर्ण नोकरी या दोन अन्य घटकांवरही आळा घालता येईल, असेही शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.