The ability to hear will be reduced

कान (ear) हे शरीराचे महत्वाचे इंद्रिय आहे. ऐकण्याचे महत्वाचे कार्य कानाद्वारे होत असल्याने आपल्या आयुष्यात त्याचे खुप महत्व आहे. यासाठीच कानाचे आरोग्य राखणे महत्वाचे ठरते. मात्र, काही चुकीच्या सवयींमुळे कमी वयातच कानांची ऐकण्याची क्षमता कमी होत असल्याचे दिसून येत आहे. जर ऐकण्याची क्षमता वयाच्या 40 ते 50 दरम्यान कमी झाली तर व्यक्तीला अस्वस्थता वाटणं, चिडचिड होणं अशा समस्या जाणवतात. कोणत्या चुकीच्या सवयींमुळे ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो, ते जाणून घेवूयात…

नक्की वाचा

1) ‘असा’ 4 प्रकारचा आहार घेतला तर फुफ्फुसांमध्ये जमा होणारी घाण लगेचच होईल दूर

2) घशात खवखव करतोय, करा ‘हा’ सोपा आणि प्रभाव उपाय, ‘या’ 5 गोष्टी लक्षात ठेवाहे लक्षात ठेवा

1) जास्त आवाज

जास्त आवाजाच्या वातावरणात राहाणे, हेडफोनने खुप मोठ्या आवाजात गाणी ऐकणे, यामुळे कान लवकर खराब होऊ शकतात.

2) तोंडाच्या समस्या

तोंडातील बॅक्टेरिअल इंन्फेक्शनची समस्या कांनासाठी धोकादायक ठरू शकतं. याकडे दुर्लक्ष करू नका. त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.

3) धुम्रपान

सिगारेट ओढल्याने सुद्धा ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. सिगारेट ओढण्याचा कानांशी संबंध आहे. सिगारेटमध्ये अनेक विषारी घटक असतात. जे फुफ्फुसांमध्ये जमा होतात. याद्वारे रक्तातसुद्धा हे घटक मिसळतात. त्यामुळे शरीरातील संपूर्ण अवयवांना नुकसान पोहोचतं. कानांचे अंतर्गत अवयव आणि पेशी खूपच नाजूक असतात. त्यामुळे विषारी पदार्थांच्या संपर्कात आल्यामुळे कानांची कार्यक्षमता कमी होते.

4) मद्यपान

मद्यपानामुळे सुद्धा कानांवर परिणाम होतो. दुय्यम दर्जाच्या मद्याचे सेवन केल्यास ऐकण्याची क्षमता कमी होऊ शकते.