Red fruits

लाल रंगाच्या फळात (
fruit) आणि भाजीत एक विशेष अँटीऑक्सीडेंट आढळते, जे आपल्या शरीरासाठी अतिशय लाभदायक आहे. लाल रंगाच्या भाज्या आणि फळे जसे की, – टोमॅटो, सफरचंद, डाळिंब, चेरी, स्ट्रॉबेरी, टरबूज, बीट, कांदा, लाल कोबी, करवंद, रासबेरी, रेड बेल इत्यादी. यामध्ये लायकोपीन नावाचे अँटीऑक्सीडंट आढळते, जे कँसर रोखण्यात आणि अनेक आजारांचा धोका कमी करण्यासाठी लाभदायक आहे. लाल रंगाच्या भाज्या आणि फळे यांचे कोणते फायदे आहेत ते जाणून घेवूयात.

नक्की वाचा

1) ‘असा’ 4 प्रकारचा आहार घेतला तर फुफ्फुसांमध्ये जमा होणारी घाण लगेचच होईल दूर


2) घशात खवखव करतोय, करा ‘हा’ सोपा आणि प्रभाव उपाय, ‘या’ 5 गोष्टी लक्षात ठेवा


3) दातांमधून रक्त येत असल्यास अजिबात दुर्लक्ष नका करू


4) वाफ घेण्याची योग्य पद्धत आणि फायदे


5) बहुगुणी तिळाचे आरोग्याला होणारे 10 आश्चर्यकारक फायदे


लाल भाज्या आणि फळांचे फायदे

1) कँसरपासून बचाव

यातील लायकोपीन एक असे अँटीऑक्सीडेंट आहे जे कँसरपासून वाचण्यासाठी उपयोगी आहे. कँसरच्या पेशी वाढत नाहीत. रिसर्चनुसार, स्किन कँसर, लंग कँसर, कोलन कँसर, ब्रेस्ट कँसर इत्यादी रोखण्यासाठी हे उपयोगी आहे.

2) हृदय निरोगी रहाते

याच्यातील लायकोपीनमुळे हृदय निरोगी राहण्यास मदत होते. ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहाते. बॅड कोलेस्ट्रॉल कमी होतात.

3) इम्यूनिटी वाढते

यातील लायकोपीन आणि व्हिटॅमिन सीमुळे रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते.

4) पचनशक्ती वाढते

यामध्ये भरपूर फायबर असल्याने तसेच नैसर्गिक पाणी असल्याने पचनशक्ती मजबूत होते. शरीर थंड आणि हाइड्रेट राहाते.

5) सांधेदुखीत उपयोगी

यातील लायकोपीनमुळे सांधेदुखी, सूज, कमी होण्यास मदत होते.

 

टीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अ‍ॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अ‍ॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.