Eating potatoes does not increase weight

बटाटा (potatoes) सेवन केल्याने वजन वाढते असा अनेकांचा समज आहे. बटाटा हा एक असा प्रकार आहे, जो काहीजण नियमित सेवन करतात. मात्र, वजन वाढेल आणि पोटात गॅस होईल, या भितीने काही लोक बटाटा खात नाहीत. उलट, बटाटा (potatoes) खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात. बटाटा खाल्याने शरीराला कोणते फायदे होतात ते जाणून घेवूयात.

नक्की वाचा
1) हे आहे सत्य

एका रिसर्चनुसार, योग्य पद्धतीनं बटाटे खाल्ल्यास वजन कमी करण्यासाठी ते उपयोगी ठरू शकतात. बटाट्यात कार्बोहायड्रेट असल्याने योग्य पद्धतीत आणि योग्य प्रमाणात बटाटे खाणे लाभदायक ठरते.

2) काय आहे बटाट्यात

बटाट्यात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी 6, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम, झिंक आणि फॉस्फरस असतं. याच्या सेवनाने त्वचा तजेलदार होते. तर व्हिटॅमिन सी मुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते.

3) मधुमेहाचा धोका

जास्त प्रमाणात बटाटा सेवन केला तर मधुमेह होण्याची शक्यता असते. पण यापासून होणारे नुकसान खुपच कमी आहे. मात्र, योग्य प्रमाणात याचे सेवन केले पाहिजे. तो तळून खाणे टाळा. बटाटा उकडून खा.

4) फॅट फ्री

बटाटा हा पिष्टमय पदार्थ आहे. यात पोटॅशिअमचे प्रमाण जास्त आणि सोडीयमचे प्रमाण कमी असते. बटाटा हा फॅट फ्री आहे. यामुळे वजनावर याचा परिणाम होत नाही, ते नियंत्रणात राहाते. उलट याच्या सेवनाने पोट साफ होते, त्वचा चमकदार होते.

 

टीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अ‍ॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अ‍ॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.