अनेकदा तोंडातील फोड (Mouth Ulcers) ज्यास माऊथ अल्सर(Mouth Ulcers) म्हटले जाते ते खूप दिवस बरे होत नाहीत आणि ते इतके त्रासदायक असतात की, उपाशी झोपावे लागते. हे बरे करण्यासाठी बाजारात अनेक प्रकारची औषधे मिळतात, परंतु त्यांचा कधी परिणाम होतो तर कधी नाही. परंतु, असे काही घरगुती उपाय आहेत, जे यावर गुणकारी आहेत. हे उपाय जाणून घेवूयात...

नक्की वाचा

1) ‘असा’ 4 प्रकारचा आहार घेतला तर फुफ्फुसांमध्ये जमा होणारी घाण लगेचच होईल दूर

2) घशात खवखव करतोय, करा ‘हा’ सोपा आणि प्रभाव उपाय, ‘या’ 5 गोष्टी लक्षात ठेवाकरा हे घरगुती उपाय

1. एक तोळा हळद एक लीटर पाण्यात उकळवून कोमट करून दिवसात दोन वेळा गुळण्या करा.

2. जांभळाची पाने वाटून, पाण्यात मिसळून गुळण्या करा.

3. ग्लिसरीनमध्ये वाटलेली तुरटी मिसळून कापसाच्या मदतीने फोडांवर लावून लाळ गळू द्यावी.

4. शुद्ध तूप रात्री झोपताना फोडांवर लावा.

5. पिंपळाची साल आणि पाने वाटून फोडांवर लावा.

6. पेरूची दोन-तीन पाने काथ मिसळून चावल्याने मोठे फोडसुद्धा बरे होतात.

7. चमेलीची पान चावून थूंकावीत.

8. सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी ताकाने गुळण्या करा, आराम मिळेल.

9. काथ घेऊन त्याची पेस्ट लावा.

10. पन्नास ग्रॅम तूपात 6 ग्रॅम कापूर टाकून गरम करा आणि ते लावा.

 

टीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अ‍ॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अ‍ॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.