Go to the doctor if you see 6 'signs' of disease on the lips

शरीराची (Human body) विविध अंगे आपणास आजारांचा संकेत देत असतात. याप्रमाणे ओठही आपल्याला काही आजारांचे संकेत देत असतात. या संकेतांवरुन आपणास वेळीच सावध होता येते. फाटलेले ओठ हे डायबिटीजचे लक्षण असू शकते. शरीरात व्हिटॅमिन सी, नुट्रीएंट्सची कमतरता आणि इम्यून सिस्टम कमजोर झाल्यास ही समस्या होऊ शकते.

नक्की वाचा

1) ‘असा’ 4 प्रकारचा आहार घेतला तर फुफ्फुसांमध्ये जमा होणारी घाण लगेचच होईल दूर

2) घशात खवखव करतोय, करा ‘हा’ सोपा आणि प्रभाव उपाय, ‘या’ 5 गोष्टी लक्षात ठेवाओठांना सूज आल्यास हा अ‍ॅलर्जीचा संकेत आहे. कधी-कधी खाण्याची रिअ‍ॅक्शन आणि इन्फेक्शनमुळे ओठांवर सूज येते. ओठांवर किंवा ओठांच्या काठाचे साल निघणे हे इनडायजेशन, व्हिटॅमिन सी आणि बी-१२ च्या कमतरतेचा संकेत असू शकतो. डस्ट इन्फेक्शन आणि औषधांच्या साइडइफेक्ट्मुळेही साल निघतात. यामुळे असे संकत दिसून आल्यास डॉक्टरांकडे जावे.

व्हायरल इन्फेक्शन, डस्ट आणि इम्यून सिस्टम खराब झाल्यामुळे ओठांवर पुरळ उठण्याची समस्या होऊ शकते. तसेच ओठांचे काठ फाटणे हा व्हिटॅमिन बी-१२ ची कमतरता अथवा फंगल इन्फेक्शनचा संकेत असू शकतो. ओठ पिवळे पडणे हा अॅनीमिया म्हणजेच शरीरात रक्ताच्या कमतरतेचा संकेत असतो. असा संकेत दिसून आल्यास थकवा आणि कमजोरीची समस्याही जाणवते.