
कोरोनाचा (COVID-19) धोका आणि पावसाळ्यात पसरणारे आजार या दोन्हीपासून बचाव करायचा असेल तर रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असणे खुप आवश्यक आहे. जीवनशैलीत बदल आणि योग्य आहार, आयुर्वेदिक उपाय इत्यादीने रोगप्रतिकारशक्ती (Immunity) वाढू शकते. मात्र काही चुका जर तुमच्याकडून सतत होत असतील तर रोगप्रतिकारकशक्त(Immunity) वाढत नाही. या चुका कोणत्या ते जाणून घेवूयात…
या आहेत त्या चुका
1 आहार आणि वेळा
खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष करणे, जेवणाच्या आणि नाष्त्याच्या वेळा न पाळणे, कधीही मुड होईल तेव्हा जेवणे, यामुळे रोगप्रतिकारकशक्ती कमी होते.
नक्की वाचा
1) ‘असा’ 4 प्रकारचा आहार घेतला तर फुफ्फुसांमध्ये जमा होणारी घाण लगेचच होईल दूर
2) घशात खवखव करतोय, करा ‘हा’ सोपा आणि प्रभाव उपाय, ‘या’ 5 गोष्टी लक्षात ठेवा
2 आळस
आळस अंगात भरलेला असल्यास व्यायामकडे दुर्लक्ष होते. यामुळे रोगप्रतिकारकशक्ती कमी होते.
3 वेळे झोप
पुरेशी झोप न घेतल्याने रोगप्रतिकारकशक्ती कमी होते. कमी व अशांत झोपेमुळे शरीरातील एंटिजन्स योग्यप्रकारे काम करत नाहीत.
4 डी व्हिटॅमीन्स
शरीरात व्हिटामीन डी ची कमतरता निर्माण झाल्यास रोगप्रतिकारकशक्ती कमकुवत होते. यासाठी सकाळी कोवळ्या उन्हात थांबा.
टीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.
0 Comments