भारतीय लोकांच्या दिवसाची सुरुवात चहानेच (Tea) होते, तर काहींना तर चहा पिला नाही तर काम करणेच अवघड होते. आता तर चहाचे वेगवेगळे प्रकार आले असून उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात लोक आइस टी घेणे पसंद करतात. या चहाला आरोग्यासाठी फायदेकारक देखील मानले जाते. परंतू नुकत्याच आलेल्या एक रिपोर्ट नुसार त्यातून होणारे नुकसान देखील समोर आले आहे.


आपल्याला वाटते की उन्हाळ्यात आइस टी पीने चांगले असते. हा विचार करुन आपण हवे तेव्हा आइस टी पितो. एका रिपोर्टनुसार आइस टी पिल्याने किडनीला नुकसान होऊ शकते. खरंतर ब्लॅक टी मध्ये देखील एक केमिकल असते जे किडनी स्टोन आणि किडनी फेल होण्यास कारणीभूत ठरतात.एवढेच नाही तर आइस टी पिल्याने वजन वाढते,त्यात साखरेचे प्रमाण जास्त असते, ज्याने एकदम वजन वाढते. 

नक्की वाचा

1) ‘असा’ 4 प्रकारचा आहार घेतला तर फुफ्फुसांमध्ये जमा होणारी घाण लगेचच होईल दूर


2) 
घशात खवखव करतोय, करा ‘हा’ सोपा आणि प्रभाव उपाय, ‘या’ 5 गोष्टी लक्षात ठेवा


3) 
दातांमधून रक्त येत असल्यास अजिबात दुर्लक्ष नका करू


4) वाफ घेण्याची योग्य पद्धत आणि फायदे


5) 
जेवताना कधीही करू नका ‘ही’ चूक, आरोग्यासाठी ‘हे’ आहेत ७ धोके!याशिवाय जास्त प्रमाणात आइस टी पिल्याने शरीरात कॅफेनचे प्रमाण आधिक होऊ शकते, ज्याने कार्डियोवस्कुलर सिस्टम वर वाईट परिणाम होतो.काहीवेळा लोक शुगर सोड्यात देखील आइस टी मिक्स करुन पितात. ज्याने त्याचे ड्रिंक गोड होते परंतू ते आरोग्यासाठी योग्य नसते. डायबिटीस पेशंटने याचे सेवन टाळले पाहिजे. त्याच्यासाठी याचे सेवन धोकादायक ठरु शकते. स्ट्रोक पडण्याचे मोठे कारण डायट कंट्रोल न होणे हे असते, आइस टी ने साखरेचे प्रमाण वाढते, ज्याचा थेट परिणाम कॉलेस्ट्रॉलवर होतो. कॉलेस्ट्रॉल वाढल्याने स्ट्रोक येण्याची शक्यता आधिक वाढते. 

असा प्या आइस टी 


जर तुम्ही आइस टी पिऊ इच्छितात तर सगळ्यात चांगला पर्याय म्हणजे त्यात साखर न टाकता पिणे. तसेच याशिवाय आइस टी दिवसातून जास्तीत जास्त एकदाच आइस टी प्यावा. साखरे शिवाय आइस टी पिण्याचे अनेक फायदे आहेत. ज्याने ब्लड प्रेशर कमी होण्यास मदत होते. त्वचेच्या संबंधित समस्या देखील कमी होतात.