To lose weight

वजन कमी (Weight loss) करण्यासाठी व्यक्ती अनेक उपाय करत असतात. यामध्ये जिम लावण्यापासून ते आपल्या आहारावर नियंत्रण यांसारखे उपाय करत असतो. शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी कार्बोहायड्रेट घेणं टाळावं लागतं. कार्बोहायड्रेटमुळे वजन झपाट्यानं वाढतं. त्याचबरोबर आपल्या आहारात आपण दररोज पोळी आणि भाकरीचा समावेश करत असतो. परंतु तो किती प्रमाणात असावा याचा आपल्याला अंदाज नसतो. दररोजच्या कॅलरीच्या प्रमाणाला लक्षात घेता पोळी किंवा भाकरीचे सेवन करावं. यामुळे आपल्या वाढत्या वजनाला कमी करण्यात मदत मिळेल. भारतीय आहारामध्ये पोळी आणि भात हे कार्बोहायड्रेटचे चांगले स्रोत आहेत. जवळ-जवळ प्रत्येक घरात भात आणि पोळ्या नियमित पणे लोकं खातात. परंतु वजन कमी करायचे असेल तर याचे किती प्रमाणात सेवन करावे हे आज आपण पाहणार आहोत.

नक्की वाचा

1) ‘असा’ 4 प्रकारचा आहार घेतला तर फुफ्फुसांमध्ये जमा होणारी घाण लगेचच होईल दूर





5) 
जेवताना कधीही करू नका ‘ही’ चूक, आरोग्यासाठी ‘हे’ आहेत ७ धोके!


गव्हामध्ये पौष्टिक घटक आढळतात. त्यामुळं त्यापासून तयार होणाऱ्या पोळ्यांमध्ये फक्त कार्बोहायड्रेटचं नव्हे तर इतर आवश्यक पोषक घटक देखील आढळतात. गहू हे प्रथिनं, फॅट, फॉस्फरस, मॅग्नेशियम, फॉलेट आणि लोहाचं सर्वात चांगलं स्रोत असतं.त्यामुळं शरीराला आवश्यक सर्व घटक तुम्हाला यामधून मिळतात. पण तुम्हाला हि गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे कि,आहारात फक्त कार्बोहायड्रेटचे प्रमाण कमी केल्यानं वजन कमी होत नसतं.यासाठी आपल्याला इतर गोष्टी जसे की आपली जीवन शैली, झोपण्याची पद्धत आणि नियमितपणे व्यायामाची दिनचर्या या गोष्टी देखील आवश्यक आहेत. निरोगी आणि संतुलित आहारासह या गोष्टीकडे लक्ष द्यायला हवं.

दिवसाला इतक्या पोळ्या किंवा भाकरी खाव्यात

गव्हामधून आपल्याला जास्तीतजास्त कार्बोहाड्रेट्स मिळत असतात. तुम्हाला दिवसाला किती कार्बोहाड्रेट्स लागतात हे तुम्हीआधी ठरवायला हवे. त्यानंतर तुम्ही त्या आधारे दिवसाला किती पोळ्या खायच्या हे ठरवायला हवे. 6 इंचाच्या लहान पोळी मध्ये देखील 71 कॅलरी आढळते. आपण दुपारच्या जेवणात 300 कॅलरी घेता, तर आपण 2 पोळ्या खाऊ शकता. या पासून आपल्याला 140 कॅलरीच मिळते. त्यामुळे आपल्या कॅलरीच्या सेवन करण्यावरच हे अवलंबून आहे की आपल्याला दिवसात किती पोळ्या खायला हव्या. दिवसातून चार पोळ्या खाणं वजन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहेत. त्यामुळं आपल्या वजनानुसार तुम्ही किती पोळ्या खायच्या हे ठरवा.