Peanuts soaked in water every day will have 10 benefits

भारतात आहारामध्ये शेंगदाण्यांचा वापर मोठ्याप्रमाणात केला जातो. शेंगदाणे वापरून विविध पदार्थ बनविले जातात. यामध्ये भरपूर प्रोटीन असल्याने आरोग्यासाठी ते खूप लाभादायक आहेत. मात्र, हे पाण्यात भिजवून खाल्ल्यास दुप्पट फायदा होतो, असे तज्ज्ञ सांगतात. शेंगदाणे पाण्यात भिजवल्याने यातील न्यूट्रिएंट्स बॉडीमध्ये पुर्णपणे अब्जॉर्ब केले जातात. भिजवलेले शेंगदाणे खाण्याचे १० फायदे जाणून घेवूयात.

हे होतात फायदे

 यात अँटी इम्फ्लेमेटरी प्रॉपर्टीज असतात, यामुळे संधीवातापासून बचाव होतो.
 यातील व्हिटॅमिन बी ६ मुळे मेंदूची शक्ती वाढते.
 यामध्ये फॉलिक अ‍ॅसिड असते, हे प्रेग्नेंसीसाठी लाभदायक असते.
 यातील ट्रीप्टोफेनमुळे मूड चांगला राहतो.
 यामध्ये बीटा केरोटीन असते, यामुळे डोळे हेल्दी राहतात.
 यामुळे कोलेस्टेरॉल लेव्हल कमी होते. हृदविकारापासून बचाव होतो.
 यातील कॅल्शियम, प्रोटीन्समुळे मसल्स टोन्ड होतात.
 हे खाल्ल्याने ब्लडशुगर लेव्हल नियंत्रणात राहते. डायबिटीजचा धोका कमी होतो.
 यातील फायबरर्समुळे पचनक्रिया चांगली होते.
१० यामध्ये आमेगा ६ फॅटी अ‍ॅसिड असते, यामुळे त्वचा गोरी व चमकदार होते.