stay healthy

कोरोना विषाणू (Corona virus) टाळण्यासाठी प्रत्येकाने पौष्टीक आहार घ्यावा, असा सल्ला देण्यात येतो. परंतु चुकीच्या खाण्याच्या सवयीमुळे कोरोनासोबत इतर आजार होण्याचा धोका वाढला आहे. खाण्याशी संबंधित काही चुकीच्या सवयीं काय असतात, हे पाहूयात

नक्की वाचा

१) नाष्टा न करणे

बर्‍याचदा लोक विचार करतात की वजन कमी करण्यासाठी नाष्टा न करणे योग्य आहे. पण याचा परिणाम आरोग्यावर होतो. तज्ज्ञांच्या मते सकाळी नाष्टा केल्याने शरीरात दिवसभर ऊर्जा राहते आणि आजारांपासून बचाव होतो.

२) चहा, कॉफी, सोडा इत्यादींचा जास्त प्रमाणात सेवन

चहा, कॉफी, सोडयाचे अती प्रमाणात सेवन केल्याने शरीरात सूज येण्याची समस्या उद्भवू शकते. शरीरात प्रतिकारशक्ती कमी होते, थकवा आणि अशक्तपणा वाढून आजार होण्याचा धोकाही वाढतो.

३) घरी बनविलेले अन्न न खाणे

तळलेले आणि भाजलेले आणि मसालेदार पदार्थ जास्त काळ खाल्ल्याने आजार होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे घरचे ताजे आणि कमी मसालेदार अन्न खावे. प्रतिकारशक्तीच्या वाढीसह, दिवसभर शरीरात उर्जा राहते..

४) घाईघाईत खाणे

जर अन्न व्यवस्थित चावले गेले नाही तर ते पचण्यास अडचणी निर्माण होतात. यामुळे पचन क्रिया नीट न झाल्यामुळे पोटाशी संबंधित आजार होण्याचा धोका वाढतो. नेहमी अन्न व्यवस्थित चावूनच खायला हवे.

५) स्नॅक म्हणून काहीही खाणे

बर्‍याचदा लोक तळलेले, मसालेदार, प्रक्रिया केलेले खाद्य आणि स्नॅक्स म्हणून बर्‍याच गोड पदार्थ खाण्यास प्राधान्य देतात. यामुळे आरोग्यास हानी होते. अशा परिस्थितीत निरोगी स्नॅक्स म्हणून नेहमी सुका मेवा, चिया बिया, सूर्यफूल बियाणे, ताजी फळे खाल्ली पाहिजेत.

६) फळांचे सेवन करणे

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, दररोज ताजे फळे खाणे किंवा त्याचा रस पिल्याने पचनक्रिया सुधारते. यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढते आणि रोगांपासून संरक्षण होते. आपल्या आहारात फळे समाविष्ट केले पाहिजे. फळांचे सेवन केल्याने शरीराला सर्व जीवनसत्त्वे आणि खनिजे मिळतात.