Work will never make you sick

आजकालच्या धक्काधकीच्या जीवनशैलीमुळे अनेक जण अगदी लहान वयातच आजारांनी (illness) वेढलेले असतात. तज्ज्ञांच्या मते, निरोगी राहण्यासाठी आपण सकाळी फिरायला(daily walking) जाणे गरजेचे आहे.  सकाळी फिरायला(daily walking) एक व्यायाम आहे. त्यामुळे संपूर्ण शरीर सक्रिय राहते.  परंतु शरीर योग्यप्रकारे कार्यही करते. जर आपण सकाळ आणि संध्याकाळी २०-२५ मिनिटे चालण्याची सवय लावली तर अनेक आजार आपल्या भोवती फिरणार नाहीत. प्रत्येक व्यक्तीने दिवसातून 30 मिनिटे चालणे आवश्यक आहे. म्हणजे सुमारे 10,000 पावले  (6 ते 7 किमी). आपण सामान्यपेक्षा किंचित वेगाने चालत आहात. जर आपण ज्येष्ठ असाल तर हळू हळू चालत राहा. चालताना दीर्घ श्वास घेऊ शकता. जेणेकरुन फुफ्फुसांना भरपूर ऑक्सिजन मिळेल.

कोणत्या वयोगटात किती चालले पाहिजे?

१) ६ ते १७ वर्षे – मुले १५००० पावले आणि मुली १२००० पावले
२) १८ ते ४० वर्षे – १२००० पावले
३) ४० वर्ष – ११००० पावले
४) ५० वर्ष – १०००० पावले
५) ६० वर्षे – ८००० पावले
( वयोवृध्द लोकांनी थकल्यासारखे वाटत नाही तो पर्यंत चालावे.)

नक्की वाचा

1) ‘असा’ 4 प्रकारचा आहार घेतला तर फुफ्फुसांमध्ये जमा होणारी घाण लगेचच होईल दूरचालण्याचे हे आहेत फायदे  ....

वजन कमी करणे

सकाळ आणि संध्याकाळी चालण्यामुळे ३५०० कॅलरी जळतात, त्यामुळे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. त्याचबरोबर आपल्याला दिवसभर निरोगी देखील वाटेल. चालणे हा सर्व वयोगटातील लोकांसाठी उत्तम पर्याय आहे.

हृदय निरोगी ठेवा

सकाळ आणि संध्याकाळी चालल्यामुळे तुमचे हृदय तंदुरुस्त ठेवण्यास मदत करते.  संशोधनानुसार, जे लोक दररोज १५००० पावले चालतात त्यांना हृदयाशी संबंधित आजार कमी असतात. वास्तविक,चालण्यामुळे रक्तभिसरण नियंत्रण राहते.

रक्तदाब नियंत्रण

वाढलेला रक्तदाब अनेक रोगांना आमंत्रण देतो. अशा परिस्थितीत चालणे आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकते. दररोज सकाळ आणि संध्याकाळी चालण्यामुळे रक्तदाब सामान्य राहतो.

मानसिक आरोग्य

एका संशोधनानुसार, दररोज फेरफटका मारल्याने मेंदू आणि मज्जासंस्थेमध्ये उपस्थित हार्मोन्स सक्रिय राहतात, ज्यामुळे स्मृती ठीक राहते.  यामुळे ताणतणाव, वेड, उदासीनता आणि अल्झाइमरचा धोका देखील कमी होतो.

श्वसनयंत्रणा निरोगी

कोरोनाबाधित रूग्णांमध्ये श्वसनयंत्रणेवर परिणाम होऊन मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक आहे. कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी दररोज ३० मिनिटं चालण्याच्या व्यायाम केल्यानं श्वसनयंत्रणा निरोगी राहते. कोरोनाकाळात रोज चालण्याचा व्यायाम करणं गरजेचं झालं आहे.

पोट साफ राहते

असिडीटी, अपचन याासारख्या आजारामुळं तुम्ही त्रस्त असालं तर तुम्ही दररोज २० ते २५ मिनिटं चालल्यामुळे या त्रासातून सुटका होईल.

 

टीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अ‍ॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अ‍ॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.