अंंडी (eggs) उकडताना काही चूक झाल्यास ती फुटतात. शिवाय आणखीही काही नुकसान होते. अंडी उकडताना कोणती काळजी घ्यावी, ती कशी उकडावीत याविषयी आपण माहिती घेणार आहोत. अंडे उकडण्यासाठी प्रथम पाणी गरम करावे. पाणी उकळल्यावर त्यामध्ये अंडे टाकावे. यामुळे अंडे फुटणार नाही आणि न्यूट्रिएंट्स टिकून राहतील.

नक्की वाचा

1) ‘असा’ 4 प्रकारचा आहार घेतला तर फुफ्फुसांमध्ये जमा होणारी घाण लगेचच होईल दूर
अंडी मंद आचेवर १० मिनिटे उकळली तरी ती शिजतात. शिवाय यामुळे अंड्यांचे पुर्ण न्यूट्रिएंट्स आपल्याला मिळतात. अंडे उकडताना पाण्यात मीठ टाका. यामुळे उकडल्यानंतर अंड्याचे साल सहज निघेल. जर हाफ बॉइल्ड एग खायचे असतील तर अंडे ३-४ मिनिटे उकडावे. पूर्ण उकडलेली अंडी आवडत असतील तर अंडी १० मिनिटे उकळवत ठेवा. अंडी उकळताना ती पाण्यात पुर्णपणे बुडतील ऐवढे पाणी ठेवावे. पाणी कमी असल्यास अंडी फुटू शकतात.

अंडे उकडताना टिचले तर त्याच्या सालीवर व्हिनेगर लावा. यामुळे अंडे पुर्णपणे फुटणार नाही. अंडे उकडल्यानंतर लगेच थंड पाण्यात टाकू नये. असे केल्याने अंड्याच्या योकचा रंग हल्का होतो. शिवाय चव बिघडते. अंडी उकडण्याआधी स्वच्छ धुवून घ्यावीत. यामुळे याच्या सालीमधील साल्मोनेला बॅक्टेरिया पुर्णपणे नष्ट होतील. उकडलेले अंड्याचे साल वरच्या भागातून काढणे सुरु करावे. येथे असलेल्या हवेच्या पोकळीमुळे अंडे अलगद सोलता येते.