Do it for hair growth

लसूण (Garlic)  केवळ जेवणाची केवळ चव वाढवत नाही तर आरोग्यवर्धकही आहे. खारट रस नैसर्गिकरीत्या असणारा लसूण हा एकमेव कंद आहे. लसूण गोड, खारट, तुरट, कडू आणि तिखट या पाच चवींनी युक्त असतो. लसूणाचे सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते , कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रित राहते, पचनक्रिया सुधारते, हृदयाचे आरोग्य चांगले राहते. त्याचप्रमाणे लसूणाचा वापर करून तयार केलेले गार्लिक ऑईल केसांच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे. जाणून घ्या गार्लिक ऑईल बनवण्याची पद्धत व त्याचे केसांसाठी होणारे फायदे.

नक्की वाचा

1) ‘असा’ 4 प्रकारचा आहार घेतला तर फुफ्फुसांमध्ये जमा होणारी घाण लगेचच होईल दूर


2) 
घशात खवखव करतोय, करा ‘हा’ सोपा आणि प्रभाव उपाय, ‘या’ 5 गोष्टी लक्षात ठेवा


3) 
दातांमधून रक्त येत असल्यास अजिबात दुर्लक्ष नका करू


4) वाफ घेण्याची योग्य पद्धत आणि फायदे


5) 
जेवताना कधीही करू नका ‘ही’ चूक, आरोग्यासाठी ‘हे’ आहेत ७ धोके!


असे तयार करा ‘गार्लिक ऑईल’

मोठा चमचा लसूण पेस्ट घेऊन ती एका भांड्यामध्ये गरम करून घ्यावी. लसूण पेस्ट थोडी गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक कप खोबरेल तेल घालावे. हे लसूण मिश्रित तेल थोडेसे रंग बदलेपर्यंत तापू द्यावे. त्यांनतर तेल थंड होऊ द्यावे. थंड झाल्यानंतर हे तेल गाळून घेऊन बाटलीमध्ये भरून ठेवावे. आठवड्यातून दोन वेळा हे तेल हलके कोमट करून त्याने केसांच्या मुळांशी मसाज करावा.

गार्लिक ऑईलचे केसांसाठी फायदे

लसूण मिश्रित तेलातील सल्फरमुळे केसांची मुळे बळकट होऊन केसांची लांबी झपाट्याने वाढते.
लसूणातील रासायनिक तत्वांनी केंसाच्या मुळांशी रक्ताभिसरण वाढते.
यामुळे केस गळती कमी होऊन केसांची उत्तम वाढ होते.
केसांतील कोंडा नाहीसा होतो.