benefits of eating sesame seeds

भारतीय खाद्यसंस्कृतीत तीळ (sesame street) या पदार्थाला अत्यंत महत्त्व आहे. उष्ण असल्यानं हिवाळ्यात याचं जास्त सेवन केलं जातं. लाडू चटणी असं विविध प्रकारे तिळाचं सेवन केलं जातं. आज आपण तिळाच्या विविध फायद्यांबद्दल माहिती घेणार आहोत.

1) अनेकांना हिवाळ्यात थंडी सहन होत नाही. अशा वेळी अर्धा चमचा तीळ (sesame street) खाऊन त्यावर कोमट पाणी प्यावं. यामुळं शरीरातील उष्णता टिकून राहते.

2) अनेकांची त्वचा कोरडी असते अशांनी आहारात तिळाचा समावेश करा. यामुळं त्वचेचा पोत सुधारतो.

3) ज्यांना उष्णतेचा त्रास आहे किंवा उष्णतेचे विकार आहेत त्यांनी तीळ कमी प्रमाणात खावा.

नक्की वाचा

1) Health Tips : रोज सकाळी लिंबू पाणी पिण्याचे होतात ‘हे’ 9 जबरदस्त फायदे

4) तीळ पचण्यास जड असतो. त्यामुळं भाकरील तीळ लावून त्याचं सेवन करावं.

5) तीळाच्या कुटाचा भाजीतदेखील वापर केला जातो. अनेक ठिकाणी दाण्याच्या कुटाला पर्याय म्हणून तीळाचा कुट वापरला जातो.

6) मासिक पाळीत ज्या महिलांना रक्तस्त्राव कमी होतो त्यांनी तीळाची चटणी खावी.

7) बाळंत स्त्रीला पुरेसं दूध येत नसेल तर तिला दूधात तीळ घालून ते प्यायला द्यावे यामुळं पुरेसं दूध येण्यास उपयोग होतो.

8) ज्यांना लघवी स्वच्छ होत नाही त्यांनाही तीळ, दूध आणि खडीसाखऱ खाल्ल्यास मुत्राशय मोकळं होण्यास मदत होते.

9) दातांच्या बळकटीसाठी आणि स्वच्छतेसाठी तिळाचा चांगला उपयोग होतो.

10) केसांची वाढ चांगली व्हावी यासाठी तिळाचे तेल केसांना लावणं चांगलं असतं.