Rheumatic

संधिवात (Arthritis) झाला तर हाडे कमजोर होऊन सांधा दुखीची समस्या निर्माण होते. वेदना हे संधिवाताचे मुख्य लक्षण असते. सांधेदुखी हा फक्त उतारवयात उद्भवणारा आजार नसून तो तरुण वयातही होऊ शकतो.

संधिवात होण्याची कारणे

संधिवात होण्याची अनेक कारणे आहेत. अनुवंशिकता ,  सूज, दाह, जंतूंचा प्रादूर्भाव झाल्याने , अपघातामुळे हाडांना मार लागण्यामुळे , वयोमानामुळे , हाडे ठिसूळ होण्यामुळे अशा अनेक कारणांमुळे संधिवात होत असतो. उतारवयातील संधिवात सांध्यातील हाडांच्या घर्षणामुळे होतो. तरुण वयातील संधिवात मुख्यत्वेकरून आनुवंशिकतेमुळे होतो.

नक्की वाचा
 

लक्षणे 

तरुण वयात होणाऱ्या संधिवातात  बहुतांशी वेळा सांध्याला सूज येते  व सांधा दुखतो.  हाताचे व छोटे सांधे, सकाळी आखडणे व दुखणे व दिवसभर हळूहळू सांध्यांना बरे वाटणे हे लहान वयातील संधिवाताच्या आजाराचे लक्षण आहे. वयाच्या ५० वर्षांनंतर उतारवयातील संधिवात उद्भवतो. उतारवयातील संधिवातात  मुख्यत्वेकरून गुडघे, खुबे, कंबर, मान व खांद्यांचे सांधे दुखतात.

हे पदार्थ खाणे टाळा

संधिवात असलेल्या रुग्णांनी मीठ जास्त असलेले पदार्थ टाळावेत.
रताळी, साबुदाणा, साबुदाण्याचे तळलेले पदार्थ, बटाट्याचे , मैद्याचे तळलेले पदार्थ संधिवात वाढवतात. त्यामुळे खाणे टाळावे.
अळूचे कंद वा अळूच्या पानांची वडी , बेसनाचे पदार्थ खाणे शक्यतो टाळावे.
संधिवाताच्या रुग्णांनी थंड पाणी टाळावे.