
अनेक सौंदर्य कंपन्यांचे एलोवेरा (Aloe vera) जेल बाजारात मिळते. यामध्ये त्वचेसाठी हेल्दी असे काही घटकही असतात. अॅलोवेरा जेल महागडे असल्याने अशावेळी घरीच नैसर्गिक पद्धतीने व त्याच दर्जाचे अॅलोवेरा जेल बनवता येते. याचा जास्त फायदा होऊ शकतो. हे नैसर्गिक अॅलोवेरा जेल घरच्याघरी कसे बनवावे, याची पद्धत आपण जाणून घेणार आहोत.
नक्की वाचा
1) मासिक पाळीमध्ये खूप त्रास होतो ? सूर्यफूलाच्या बियांच्या मदतीनं करा समस्या दूर
असे बनवा जेल
1) सर्वप्रथम कोरफडीच्या झाडाचा एक भाग चांगल्या पद्धतीने कापून घ्या.
2) काटे चाकूने काढून घ्या.
3) नंतर कोरफडीच्या भागाला मधून कापा. त्याचे दोन भाग करा.
4) एका चाकुच्या मदतीने त्यातील जेल वेगळे काढा.
5) फ्रेश अॅलोवेरा जेल मिळेल. जे थोडेसे पातळ असेल.
6) नंतर एका ग्राईंडरमध्ये अॅलोवेरा जेल टाकून मिक्सरमध्ये काही सेकंद त्याला मिक्स करा. ते आणखी थोडेसे पातळ होईल.
7) हे जेल आता वापरू शकता. यास आणखी गुणकारी आणि दीर्घकाळ टीकवण्यासाठी यामध्ये आणखी २ पदार्थ मिसळता येतात.
8) व्हिटॅमिन ईच्या २ गोळ्या कापून त्यातील रस जेलमध्ये टाकावा व नंतर त्याला हलकेसे मिसळून घ्यावे.
9) जेल दीर्घकाळ फ्रेश ठेवण्यासाठी व्हिटॅमिन सीचा वापर करा. यामुळे जेलमध्ये बॅक्टेरिया होत नाही. यासाठी संत्री, लेमन ऑईलचे केवळ ३ ते ४ थेंबच टाका.
10) आता या सर्व मिश्रणाला चांगल्या पद्धतीने मिक्स करुन घ्या.
11) हे मिश्रण एका प्लास्टीक किंवा काचेच्या भांड्यामध्ये पॅक करुन ठेवा. नंतर दोन तासासाठी या जेलला फ्रिजमध्ये ठेवा.
12) दोन तासानंतर हे जेल अधिक घट्ट झाल्याचे दिसेल. ७ ते १० दिवसांपर्यंत या जेलला फ्रिजमध्ये ठेवून त्याचा वापर करु शकता.
0 Comments