बदाम (almonds) एक स्वादिष्ट फळांपैकी एक आहे, परंतु ते खाण्याबद्दल लोकांचा खूप संभ्रम आहे. बदामाचे (almonds) पौष्टिक फायदे काय आहेत ते आता जाणून घेऊयात.
नक्की वाचा
1) ‘असा’ 4 प्रकारचा आहार घेतला तर फुफ्फुसांमध्ये जमा होणारी घाण लगेचच होईल दूर
१)किती खावे
प्रौढ नागरिकांनी दिवसाला पाच ते सहा बदाम खावेत. पाच वर्षापर्यंतच्या मुलांनी दोन बदाम आणि दोन वर्षाच्या मुलांनी १ बदाम खाल्ले पाहिजे.२)भिजलेले बदाम
ज्यांना योग्य प्रकारे चावता येत नाहीत, त्यांना भिजलेले बदाम खाण्याची शिफारस केली जाते, अन्यथा सामान्य व्यक्ती सोललेली बदाम खाऊ शकते.३) हृदय मजबूत करते
बदाम आपली प्रतिकारशक्ती आणि स्मरणशक्ती वाढवते. हृदय मजबूत करते. मुलांचे मेंदू विकसित करण्यास मदत होते.४)लठ्ठपणा
बदाम खाल्ल्याने वजन वाढत नाही. कोलेस्टेरॉलची पातळी आटोक्यात राहते. यामध्ये झिंक, व्हिटॅमिन ई, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम सारखी अनेक पोषक द्रव्ये असतात, जे आपल्याला तंदुरुस्त बनवतात.५) स्नॅक्स आणि डॉक्टरांचा खर्च कमी झाला
जर थंडी किंवा सर्दी असेल तर बदाम मीठात भाजून फराळ म्हणून खा. हे आपण स्नॅक्स म्हणून खाल्ले तर खर्च आणि सामान्य औषधे दोन्ही वाचवेल.६) असे खा
१)बदाम आणि मनुके बारीक करून खावे
२)बदामाचा हलवा खाऊ शकता.
३)डिंक लाडूमध्ये बदाम मिसळून खाल्ले जाऊ शकते.
४)बदाम शेक बनवून प्या.
५)हे पुडिंगमध्ये मिसळूनही खाऊ शकता.
६)स्नॅक्स म्हणून बदाम देखील खाऊ शकतो.
(जर आपण बदाम खाऊ शकत नसल्यास शेंगदाणे खा).
टीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.
0 Comments