कोरोना (Corona) संसर्गाने संपूर्ण जगाला प्रभावित केले आहे, परंतु याची दुसरी बाजू अशीही आहे की, यामुळे होणार्‍या आरोग्यासंबंधी समस्यांनी भारतालाच नव्हे, तर संपूर्ण जगाला आपली जीवनशैली आणि खाण्यापिण्यात परिवर्तन करण्यास भाग पाडले आहे. इम्युनिटी वाढवण्यासाठी आज योग्य आहार घेण्याची आवश्यकता आणखी वाढली आहे.

शाकाहाराची भूमिका महत्वाची

देश-विदेशातील आयुर्वेदिक संस्थांनी सामान्य ते दुर्धर आजारांपासून बचाव करण्यात शाकाहाराची भूमिका महत्वाची असल्याचे म्हटले आहे. शाकाहार रोगप्रतिकारशक्ती प्रदान करतो. दीर्घायु, निरोगी शरीर आणि मानसिक आरोग्यासाठी सात्विक आहार लाभदायक आहे. डिप्रेशन, एंग्जायटी अशा आजारापासून मुक्ती देतो. कोरोना काळात गुळवेल, शतावरी, अश्वगंधा यासारखी औषधी वस्पती आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवू शकतात.


नक्की वाचा

1) Health Tips : रोज सकाळी लिंबू पाणी पिण्याचे होतात ‘हे’ 9 जबरदस्त फायदे

निसर्गाचे वरदान

वास्तवात निसर्गाने मनुष्याला आहाराच्या रूपात जे दिले आहे, ते एखाद्या वरदानापेक्षा कमी नाही. डाळी, धान्य आणि भाज्या असोत की वनस्पतीच्या रूपात आढळणार्‍या आयुर्वेदिक औषधी, या सर्वांमध्ये अशी तत्व आढळतात जी आपले जीवन निरोगी ठेवतात.

शाकाहाराचे फायदे

1) मेटाबॉलिज्म संतुलित राहाते.
2) मानसिक आरोग्य सुदृढ करते.
3) रोगप्रतिकारकशक्ती वाढते.
4) सकारात्मक विचारांसह दिर्घायुष्य प्रदान करते.
5) रोगांशी लढण्यासाठी कवच बनते.
6) शरीरासाठी आवश्यक सर्व पोषकतत्व देते.

असा बनतो पूर्ण शाकाहारी आहार

1) जेवणात 6 रसांचा समावेश असावा. खारट, गोड, आंबट, तिखट, कडू आणि तुरट.
2) साखरेऐवजी मध किंवा गुळ वापरा.
3) जेवनाच्या वेळा ठरवा.
4) ब्रेकफास्ट कधीही सोडू नका.

5) हिरव्या भाज्या, धान्य, सूकामेवा, हंगामी फळे सेवन करा.