Honey is good for beauty

आयुर्वेदामध्ये (Ayurveda) मध ही एक औषधी म्हणून ओळखली जाते. विविध औषधांमध्ये मधाचा वापर केला जातो. विशेषत: लहान मुलांच्या बहुतांश औषधांमध्ये मध असतेच. मोठ्यांनादेखील आरोग्य टिकवण्यासाठी मधाचा वापर करता येऊ शकतो. मधातील या औषधी गुणधर्माचा वापर केल्यास यातून सौंदर्यवद्धी होऊ शकते. मधामुळे त्वचा मऊ आणि तजेलदार होते. मध लावल्याने त्वचेमध्ये ओलावा टिकून राहतो आणि चेहऱ्याचा सॉफ्टनेस वाढतो. रंगदेखील उजळतो. अशा या बहुगुणी मधाचे सौंदर्यवृद्धीसाठी होणारे फायदे जाणून घेऊयात.

नक्की वाचा

1) घरीच बनवा ‘एलोवेरा जेल’, अशी आहे पद्धत; स्‍वस्‍तात मिळवा सुंदर त्‍वचा

मधामध्ये चिमूटभर दालचिनी पावडर मिसळून लावल्याने पिंपल्स दूर होतात. मधामध्ये बेकिंग सोडा मिसळून हात-पायांवर लावल्याने डेड स्किन निघून जाते. मधामध्ये खोबरेल तेल मिसळून लावल्याने डाग दूर होतात. तर मधामध्ये कच्चे दूध मिसळून लावल्याने जखमेच्या खुणा दूर होतात. बटाट्याच्या पेस्टमध्ये मध मिसळून लावल्याने चेहऱ्याचा रखरखीतपणा दूर होतो. मधामध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात. यामुळे मृत त्वचा दूर होते. त्वचेची चमक वाढते. यामध्ये अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात. यामुळे मुरुमासारख्या त्वचेच्या समस्या दूर होतात.

मधातील अँटी फंगल गुणधर्मामुळे त्वचेवर पुरळ, खाज आणि सुजेसारख्या समस्या होत नाहीत. यामधील व्हिटॅमिन्स, मिनरल्स त्वचेचा रंग उजळवतात. मध वापरून गोरेपणाही वाढवता येतो. यासासाठी विविध उपाय आहेत. यासाठी मधामध्ये लिंबाचा रस आणि दही मिसळून लावल्याने टॅनिंग दूर होते. रंग गोरा होतो. पिठाच्या चाळणामध्ये मध आणि दही मिसळून लावल्याने सावळेपणा दूर होतो. मधामध्ये हळद, गुलाबजल मिसळून लावल्याने गोरेपणा वाढतो. मधामध्ये हळद पावडर मिसळून लावल्याने चेहऱ्याचा रंग उजळतो. मधामध्ये बेकिंग सोडा मिसळून हाता-पायांवर लावल्याने डेड स्किन निघून जाते. त्वचेच्या इतर समस्याही मधामुळे दूर होतात. मध कधीही खराब होत नसल्याने ते दीर्घकाळ हवाबंद डब्यात ठेवता येऊ शकतो. साठवून ठेवण्यासाठी फ्रिजबाहेर ठेवणे योग्य असते.