Follow these 8 steps for a healthy body

निरोगी (Healthy) राहण्यासाठी शरीराचे नियमितपणे निर्विषीकरण करणे अत्यंत आवश्यक आहे. या सोप्या पद्धती जीवनशैलीचा भाग बनवल्यास तुमच्या शरीरातून विषघटक सहज बाहेर टाकता येऊ शकतात. यासाठी आहारात फायबरचे प्रमाण जास्त ठेवावे. ब्राउन राइस, ताजी फळे, भाज्या, मुळा, पत्ता कोबी, ब्रोक्कली इत्यादींमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते.

शरीराचे निर्विषीकरण करण्यासाठी ऑक्सिजनची गरज भासते. त्यासाठी दररोज सकाळी ५-१० मिनिटे दीर्घ आणि खोल श्वास घ्यावा. यामुळे ऑक्सिजन शरीराच्या संपूर्ण सिस्टिमपर्यंत चांगल्यारीतीने पोहोचेल आणि निर्विषीकरण सोपे होईल. सोना बाथ निर्विषीकरणासाठी अत्यंत सहायक ठरतो. सोना बाथ घेताना निघणाक्तया घामासह शरीरातील घाणही बाहेर निघते. नकारात्मक भावनांचे सकारात्मकतेत रूपांतर केल्यानेसुद्धा शरीरातील विषारी घटक कमी होतात. खास करून तणाव सकारात्मक भावनांच्या मदतीने कमी करावा. याद्वारे तणावामुळे निर्माण हेणारे विषही शरीरातून नष्ट होतात.

नक्की वाचा

1) Health Tips : रोज सकाळी लिंबू पाणी पिण्याचे होतात ‘हे’ 9 जबरदस्त फायदे

योगासने शरीराला रोगांपासून दूर ठेवतात आणि शरीर स्वच्छ ठेवण्यासही यांची मदत होते. दररोज एक तास योगासन केले तर शरीरातील विषारी घटक निघून जातात आणि ऊर्जा मिळण्यासोबतच शरीर आतून स्वच्छ होते. निर्विषीकरणासाठी आपले यकृत स्वच्छ ठेवणे खूप गरजेचे आहे. त्यासाठी ग्रीन टीचे सेवन केले पाहिजे. क जीवनसत्त्वाचे जास्तीत जास्त सेवन करण्याचा प्रयत्न करा. हे जीवनसत्त्व ग्लूटेथॉइन नामक लिव्हर कंपाउंडची निर्मिती करते. हे कंपाउंड विषारी घटकांना दूर करण्यास सक्षम आहे. दररोज दोन लिटर पाण्याचे सेवन केले पाहिजे. जेवढे जास्त पाणी प्याल तेवढेच जास्त शरीरातील विषारी घटक लघवीवाटे बाहेर पडतात.