Eaten dill every day after meals

अनेकजण जेवणानंतर बडीशेप (Fennel) खातात. यात तांबे, लोह, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅगनीज, सेलेनियम, झिंक आणि मॅग्नेशियमसारखे क्षार आणि धातू असतात. यामुळं पोटाच्या अनेक समस्या दूर होतात. आज आपण बडीशेपच्या फायद्यांबद्दल माहिती घेणार आहोत.

1) श्वासातील दुर्गंध 

बडीशेप एक असा मुखवास आहे ज्यामुळं तोंडातील दुर्गंध दूर होतो. तोंडात लाळेचं प्रमाण वाढतं. यामुळं तोंडात अडकलेले अन्नकण निघतात. यातील अँटी बॅक्टेरियल आणि अँटी इंफ्लेमेटरी घटकही फायदेशीर ठरतात.

2) बद्धकोष्ठता, अपचन, पोटाची सूज दूर होते 

डॉक्टर सांगतात की, बडीशेपमधील तंतूमय पदार्थांमुळं शरीरातील पचनक्रिया चांगली राहते. यामुळं बद्धकोष्ठता दूर होते. जर नियमित याचं सेवन केलं तर वात आणि पित्ताची समस्या होत नाही. ज्यांना कायमच अपचन आणि बद्धकोष्ठता अशा समस्या येतात त्यांनी नियमित बडीशेपचं चूर्ण खायला हवं. बडीशेप आणि साखर यांचं चूर्ण बनवावं. 5 ग्रॅम चूर्ण कोमट पाण्यात टाकून रात्री झोपताना घ्यावं. हा उपाय जर रोज केला तर पोट साफ होईल आणि यकृत स्वस्थ राहिल. बडीशेपमुळं पोटाची सूज, पोट दुखणं, पोट फुगणं अशा समस्याही दूर होतात.

नक्की वाचा

1) Health Tips : रोज सकाळी लिंबू पाणी पिण्याचे होतात ‘हे’ 9 जबरदस्त फायदे





3)  वजन कमी करण्याचा सोपा उपाय

बडीशेपमध्ये जास्त प्रमाणात तंतुमय पदार्थ असतात. त्यामळं पोट भरल्यासारखं वाटतं. यात जास्त कॅलरीजही नसतात. यामुळं वजन कमी करण्यासाठी फायदा होतो. बडीशेप शरीरात चरबी साठू देत नाही.  जर तुम्ही बडीशेपचा चहा पिला तर यामुळं शरीरातील विषद्रव्ये बाहेर फेकली जातात. जर बडीशेपच्या बिया खाल्ल्या तर चयापचय मजबूत होण्यास मदत होते. जर चयापचय मजबूत राहिलं तर वजन कमी करण्यासाठी फायदा होतो. तुम्ही बडीशेप भाजून त्याची पूड केली आणि दिवसभरात गरम पाण्यातून दोनदा त्याचं सेवन केलं तर याचा वजन कमी करण्यासाठी खूप फायदा होतो.

4) रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी

हृदयाशी संबंधित समस्यांसाठीही बडीशेप फायदेशीर आहे. यात उच्च रक्तदाब नियंत्रित करण्याची आणि वाढलेला रक्तदाब कमी करण्याची क्षमता असते. यात पोटॅशियमदेखील आहे जे हृदयासाठी फायदेशीर ठरतं.

5) लाल रक्तपेशी वाढतात 

बडीशेपमध्ये लोह, तांबे आणि हिस्टिडाईन भरपूर असते. लाल रक्तपेशींच्या निर्मितीसाठी हे तिन्ही घटक आवश्यक असतात. बडीशेपमुळं लोह वाढण्यास मदत होते. यामुळं हिमोग्लोबीनच्या निर्मितीसाठी फायदा होतो. विशेष करून गरोदर महिलांसाठी  बडीशेप चांगली मानली जाते.

6) कॅल्शियम वाढीसाठी फायदेशीर

बडीशेप खाल्ल्यानं कॅल्शियम वाढण्यास मदत होते. यामुळं हाडं मजबूत होतात. कॅल्शियम व्यतिरीक्त त्यात फॉस्फरस, मॅग्नेशियम, जीवनसत्वही असतात.

7) त्वचा निरोगी राहते 

अँटीबॅक्टेरियल आणि अँटीऑक्सिडेंट्सनं परिपूर्ण बडीशेप निरोगी त्वचेसाठीही चांगली मानली जाते. तणावाच्या दुष्परिणामांपासून मुक्त होण्यासाठीही याचा फायदा होतो.

टीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अ‍ॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अ‍ॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.