5 Mistakes can increase the problem of periods

महिन्यातून एकदा पीरियड्स (Periods) येणे ही नैसर्गिक प्रक्रिया असली तरी या काळात महिलांनी सावधगिरी बाळगली पाहिजे. काही गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. या काळात काही चूका झाल्यास महिलांना विविध समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

अशा कमी करा वेदना

१) दिवसभर कमीत कमी ८-१० ग्लास पाणी प्या..

२) कमीत कमी ८ तासांची झोप घ्या.

३) पीरियड्सच्या वेदना कमी करण्यासाठी हॉट बॉटलने पोट शेकावे.

४) थोडी-फार एक्सरसाइज करा किंवा योग करा. यामुळे पोटदुखी कमी होते.


नक्की वाचा

1) मासिक पाळीमध्ये खूप त्रास होतो ? सूर्यफूलाच्या बियांच्या मदतीनं करा समस्या दूर

ही काळजी घ्या

१) या काळात फिजिकल रिलेशन ठेवू नका. यामुळे इन्फेक्शन होण्याचा धोका असतो.

२) हेवीवर्क केल्यास पोट आणि कंबर दुखू शकते. या काळात शरीर कमजोर होत असते.

३) याकाळात शरीराला व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सची गरज असते, त्यामुळे उपवास करू नका.

४) पुरेशी झोप घ्या. अन्यथा बॉडीपेन आणि डोकेदुखी होऊ शकते..

५) याकाळात फास्टफूड खाणे टाळा. कारण शरीराला यावेळी पौष्टीक आहाराची गरज असते.