आपली त्वचा सुरक्षित आणि निरोगी ठेवण्यासाठी अनेकजण वेगवेगळे उपाय करत असतात. त्वचेवर ग्लो आणण्यासाठी पौष्टिक आहाराचे सेवन करतात, वेगवेगळ्या क्रीम (Cream) लावतात, योगा करतात, इत्यादी प्रयत्न केले जातात. परंतु, तुम्हाला माहित आहे का, आंघोळ करताना काही सवयी फॉलो करून तुम्ही त्वचा सुरक्षित आणि चमकदार बनवू शकता.

नक्की वाचा

1) ‘असा’ 4 प्रकारचा आहार घेतला तर फुफ्फुसांमध्ये जमा होणारी घाण लगेचच होईल दूर

2) घशात खवखव करतोय, करा ‘हा’ सोपा आणि प्रभाव उपाय, ‘या’ 5 गोष्टी लक्षात ठेवा1) थंडीत कोमट पाण्याने करा आंघोळ

जेव्हा थंडी वाढते, तेव्हा आपण कोमट पाण्याऐवजी गरम पाण्याने आंघोळ करण्यास सुरूवात करतो, त्याऐवजी कोमट पाण्यानेच आंघोळ करावी. गरम पाण्याने त्वचेचे नुकसान होते.

2) साबणाऐवजी फेस वॉशने चेहरा धुवा

साबणाने चेहरा धुण्याऐवजी फेस वॉशने धुवा. साबणामुळे चेहर्‍याच्या त्वचेचे नुकसान होते.

3) हलक्या हाताने स्क्रबिंग

स्क्रबिंगने शरीर गोरे होते किंवा बॅक्टेरिया नष्ट होतात, हा समज मनातून काढून टाका. हे जोरात केल्यास जळजळ आणि रॅशेस होऊ शकतात. यासाठी हलक्या हाताने हे करा. टॉवेलने शरीर रगडू नका.

4) त्वचेच्या सुरक्षेसाठी बॉडी वॉश

आंघोळ करताना असा बॉडीवॉश वापरा, ज्यामुळे तुमची त्वचा सुरक्षित राहील आणि त्वचेचा ओलसरपणा टिकून राहील.

5) सुकलेल्या टॉवलेचा करा वापर

ओलसर टॉवले कधीही अंग स्वच्छ करू नका. खुपवेळ तो तसाच असेत तर त्यामध्ये बॅक्टेरिया, व्हायरस, फंगल्स असू शकतात. नेहमी सुकवलेला टॉवेल वापरा. रोज टॉवेल धुवा आणि उन्हात वाळवा.