Here are 4 things to know before using a condom

कंडोमविषयी अनेकजण वाचणे किंवा बोलणे टाळतात. परंतु कंडोम विषयी पूर्ण माहिती असणे पुरुषांसह महिलांनाही गरजेचे आहे. सामान्यतः कंडोमने गर्भधारणा (Pregnancy) रोखता येते हे सर्वांना माहिती असते. परंतु कंडोम हे नक्की वापरायचे कसे आणि त्यातून काय फायदा होतो हे अनेकांना माहित नाही. जाणून घ्या  कंडोमविषयी महत्वाच्या गोष्टी –

१. कंडोम कोणते वापरावे 
कंडोम नेहमी चांगल्या क्वालिटीचे वापरावे. खरेदी करताना एक्सपायरी डेट पाहावी. वापर करताना फाटलेले कंडोम वापरू नये.

२. कंडोमचे प्रकार 
कंडोम हे लॅटेक्सने बनलेले असतात . या कंडोमने काहींना  अ‍ॅलर्जी होऊ शकते म्हणून पॉ‍लीयुरथेनने बनलेले कंडोम वापरू शकतात.

३. का वापरावे कंडोम
कंडोमचा वापर प्रामुख्याने गर्भधारणा होऊ नये म्हणून केली जाते . तसेच गुप्तांगातील गंभीर आजारांपासून देखील दोघांचेही संरक्षण होते. एड्ससारख्या आजारांपासून देखील रक्षण होते.

४. कंडोम असते नाजूक 
कंडोम अत्यंत नाजूक असते. त्यामुळे वापर करताना टोकदार वस्तू , अंगठी आणि अगदी नखाने देखील ते फाटू  शकते.