Mosquitoes Bite

पावसाळ्यात आपण घराबाहेर पाय टाकताच डासांची गर्दी आपल्या डोक्यावर फिरू लागते. हाफ स्लीव्सचे कपडे घालून बाहेर जाणे तर अधिक कठीण होते. डास उद्याने, मैदान आणि अगदी घरातसुद्धा आपला पाठलाग करणं सोडत नाहीत. लाखो प्रयत्नानंतरही त्यांच्यापासून सुटका करणे कठीण होते. आपल्याला हे जाणून आश्चर्य वाटेल की डास केवळ काही लोकांनाच जास्त चावतात. यामागे अनेक वैज्ञानिक कारणेही सांगण्यात आली आहेत.

शास्त्रज्ञांचा असा दावा आहे की केवळ मादी डास माणसांना चावतात. याचे कारण मादीच्या प्रजननाशी संबंधित आहे. खरं तर, मादी डास मानवी रक्तात असलेले पोषक आहार घेतल्यानंतरच अंडी देतात. कार्बन डाय ऑक्साईड (CO2) चा वास देखील डासांना मानवांकडे वेगाने आकर्षित करतो. मादी डास तिच्या ‘सेंसिंग ऑर्गेन्स’ ने याचा वास ओळखते. श्वास बाहेर टाकताना मानवी शरीरातून CO2 गॅस बाहेर आल्यामुळे डास काही लोकांना जास्त चावतात. 150 फूट अंतरावरुन देखील डासांना याचा वास अगदी सहजपणे येतो.

संशोधकांचा असा दावा आहे की काही विशेष वास डासांना अधिक वेगाने आकर्षित करतात. मानवी त्वचेमध्ये राहणाऱ्या बॅक्टेरियातून रिलीज होणारे यूरिक अ‍ॅसिड, लॅक्टिक अ‍ॅसिड आणि अमोनियाच्या वासामुळे देखील डास मानवांच्या जवळपास फिरतात. शरीराच्या जास्त तापमानामुळे व्यक्तीला जो घाम येतो, त्यामध्ये हे घटक जास्त असतात.

जपानमधील संशोधकांनी हे सिद्ध केले आहे की डास ‘ए’ रक्तगटाच्या तुलनेत ‘ओ’ रक्तगट असणाऱ्या लोकांना जास्त चावतात. या रक्तगटाचे लोक डासांसाठी एखाद्या चुंबकासारखे काम करतात. तर बी रक्तगटाच्या लोकांना डास सामान्यपणे चावतात.