Which method of eating is harmful

भारतीय परंपरेनुसार (Tradition) अन्नाला देवाचा दर्जा आहे. असे म्हणतात की, जर जेवण योग्य प्रकारे केले गेले तर ते केवळ आपले पोषणच करत नाही तर आपले आयुष्य देखील वाढवते. शास्त्रात जेवनाबाबत अनेक पद्धती सांगितल्या गेल्या आहेत, ज्यात आरोग्यावर सकारात्मक आणि नकारात्मकही प्रभाव पडतो. जेवताना काही नियमांचे पालन केल्यास आपल्याला काही आश्चर्यकारक परिणाम मिळतात. ज्योतिषाचार्य साक्षी शर्मा यांच्यानुसार, जेवण कसे करावे जाणून घेऊया.

जेवण करण्यासाठी योग्य दिशा

वास्तु शास्त्रात जेवण करण्यासाठी पूर्व दिशा श्रेष्ठ मानली जाते. जेवताना तोंड उत्तरेकडेही करता येते. असे केल्याने शरीराला अन्नापासून मिळणारी उर्जा संपूर्णपणे मिळते. दक्षिण दिशेला तोंड करून जेवणे अशुभ आणि पश्चिम दिशेला तोंड केल्याने आजार वाढतात.

वय वाढवण्यासाठी कसे जेवण करावे?

भारतीय संस्कृतीत जेवण करण्यापूर्वी हात धुण्याची तरतूद आहे. जेवण करण्यापूर्वी दोन्ही हात, दोन्ही पाय आणि तोंड धुतल्यास वय वाढू शकते. ओल्या पायांनी जेवण केल्याने आरोग्याला फायदे होतात आणि वयात वाढ होते.

नक्की वाचा

1) ग्रीन टी पिण्याची योग्य वेळ तुम्हाला माहित आहे का ?, जाणून घ्या

जेवणात काय आहे वर्ज्य?

अंथरुणावर बसून किंवा हातात ताट धरून जेवण करू नये. जेवण नेहमी आरामात बसून केले पाहिजे. जेवणाचे ताट लाकडी चौकटीवर ठेवा आणि भांडी स्वच्छ असावीत. तुटलेल्या भांड्यात खाणे अशुभ मानले जाते.

देवाचे स्मरण

जेवण करण्यापूर्वी अन्न देवता, अन्नपूर्णा माता आणि देवाचे स्मरण करा आणि त्यांचे आभार माना. जेवण चवदार नसल्यास त्याचा तिरस्कार करू नका. असे केल्याने अन्नाचा अपमान होतो. आपल्या जेवणामधून गाय, कुत्री आणि पक्ष्यांना काही घास द्या, असे केल्याने घरात आनंद येतो.

जेवण करण्याचा विधी

जेवण बनवणाऱ्या व्यक्तीने आंघोळ करून आणि पूर्णपणे शुद्ध झाल्यानंतरच जेवण बनवले पाहिजे. जेवण तयार करताना मन शांत ठेवायला हवे. शक्य तितक्या वेळेस जेवण बनवताना आपल्या कुटुंबास निरोगी ठेवण्याचा विचार करा किंवा मंत्रांचा जप करा किंवा स्तोत्राचे पठण करा. जेवण बनवताना आपल्या मनात कोणत्याही व्यक्तीबद्दल ईर्ष्या बाळगू नये.