Drinking water from a copper pot

तांब्याच्या (
copperभांड्यातील पाणी आरोग्याला लाभदायक असतात. पाहिलं तर सोने, चांदी नंतर तांबे या धातूचा तिसरा क्रमांक लागतो. या तांब्यांच्या भांड्यांची अनेक वैशिष्ट्ये आहेत. जी शरीरास लाभदायक आहेत. तांब्याच्या भांड्यातील पाणी जास्त आरोग्यदायी असते कारण तांब्याचा अंश भांड्यातील पाण्यामध्ये उतरतो. त्यामुळे पाण्यातील रोगजंतू मरून जातात.

तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचे फायदे –

तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं पाणी हे अ‍ॅन्टीबॅक्टरीयल असल्यामुळे ज्याप्रमाणे तुमची रोगप्रतीकारक शक्ती वाढविण्यासाठी आणि शरीरावरील जखमा भरून काढण्यासाठी लाभदायक ठरतं. अ‍ॅन्टीवायरल असल्याने दाह कमी करण्यासाठी सुद्धा याची मदत होतो.तांब्याच्या भांड्यात ठेवलेल्या पाणी हे शुद्ध मानलं जातं. डायरिया आणि कावीळ सारखे आजार पसरवणारे बॅक्टेरिया नष्ट झाल्याने हे आजार तुमच्यापासून दूर राहतात.

नक्की वाचा

1) ग्रीन टी पिण्याची योग्य वेळ तुम्हाला माहित आहे का ?, जाणून घ्या

ज्यांना वारंवार कफ होतो अशांसाठी ही तांब्यातील पाणी अतिशय उपयुक्त असते. ८ तास पाणी तांब्याच्या भांड्यात ठेवल्यास त्यातील आवश्यक ते घटक पाण्यात उतरतात त्यात तुळशीचे पान टाकून ते प्यायल्यास कफाच्या समस्येपासून आराम मिळतो.तांब या धातुमध्ये दाह कमी करण्याची क्षमता असते. संधीवात किंवा सांधेदुखीचा जर तुम्हाला त्रास असेल तर दररोज तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं पाणी प्यायला हवं. यामुळे हाडं मजबूत बनतात आणि रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा वाढते. शरीरातील अनेक कार्य सुरळीत करण्यासाठी तांब्याचा उपयोग होतो. अगदी पेशींची निर्मीती करण्यापासुन ते पदार्थांतील आयर्न (लोह) व मिनरल्स शोषून घेण्यासाठी मदत होते. म्हणूनच अ‍ॅनिमियाशी सामना करणार्‍यांनी तांब्याच्या भांड्यातून आवर्जून पाणी प्यावे. तांबे रक्तातील लोह वाढवतो व रक्तपुरवठा सुरळीत होण्यास मदत होते.

‘तांबं’ रक्तदाब, हृदयाचे ठोके आटोक्यात ठेवतो तसेच कोलेस्ट्रोल नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. हृदयाला रक्तपुरवठा करणार्‍या रक्तवाहिन्यांमध्ये वाहणारा रक्तपुरवठा सुरळीत होतो.तांबे शरीरात मेलॅनीनच्या निर्मितीमध्ये मदत करते. तसेच त्वचेच्या पेशींच्या निर्मीतीत तांबे प्रमुख भुमिका बजावते. त्यामुळे रोज सकाळी तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी प्यायल्यास त्वचेचा पोत व आरोग्य सुधारण्यास मदत होते.चेहऱ्यावर अकाली पडणाऱ्या सुरकुत्या कमी करण्यासाठी तांब्याच्या भांड्यातलं पाणी फायदेशीर ठरतं. तांब्यातलं अ‍ॅन्टीऑक्सिडंट हे नवीन पेशी तयार करण्याचं काम करतं.