Make it a simple solution and maintain lasting beauty

आरोग्य (Health) आणि सौंदर्याची काळजी घेण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात असे नाही. आरोग, सौंदर्य कसे राखावे, याची माहिती तुम्हाला असेल तर छोटे-छोटे उपाय करून आणि सवयी अंगीकारून तुम्ही ते मिळवू शकता. पद, प्रतिष्ठा आणि किर्ती सर्वांनाच हवी असते. त्यासाठी प्रयत्नही केले पाहिजेत. पण, आरोग्यही तेवढेच महत्वाचे आहे. ज्याच्याकडे चांगले आरोग्य आणि शारीरीक सौंदर्य आहे तो काहीही मिळवू शकतो. आरोग्य आणि सौंदर्याची काळजी कशी घ्यावी कोणते उपाय करावेत, याविषयी आपण जाणून घेणार आहोत.

नक्की वाचा

1) ग्रीन टी पिण्याची योग्य वेळ तुम्हाला माहित आहे का ?, जाणून घ्या


चांगल्या आरोग्यासाठी सूर्योदयाच्या वेळी दररोज एक दोन ग्लास कोमट पाणी प्यावे आणि काही काळ फिरून यावे. रोजच्या आहारात किमान एक लिंबू असू द्यावे. दररोज सकाळी किंवा संध्याकाळी किमान २ ते ३ किलोमीटर पायी चालले पाहिजे. चालण्याला एक गती असायला हवी. सकाळच्या न्याहारीत फक्त मोड आलेली कडधान्ये खावीत. फास्ट फूड, तळलेले, अधिक फॅट असलेले, फ्रिजमध्ये ठेवलेले अन्य खाऊ नये. तसेच दिवसाची झोपू टाळावी. रात्रीचे जेवण रात्री ८ च्या आधी करावे.

चहा, कॉफी आणि शीतपेये शक्यतो टाळावीत. जेवल्यानंतर लगेच झोपू नये. दिवसातून जास्तीत जास्त दोन वेळा नाष्टा आणि दोन वेळा जेवण एवढाच आहार घ्यावा. यापेक्षा जास्त खाऊ नये. रोज रात्री अमृतासमान गुणकारी असलेले त्रिफळा चूर्ण घ्यावे. वरील उपाय नित्यनेमाने केल्यास तुमचे आरोग्य आणि सौंदर्य आपोआपच राखल जाईल. यासाठी प्रत्येकाने हे उपाय केले पाहिजेत. हे उपाय सोपे असल्याने ते करताना काहीच अडचणी येऊ शकत नाहीत.