
कोरोना (Corona) काळात घशात खवखव झाल्याने अनेकांच्या मनात संशयाची पाल चुकचुकते. परंतु बदलणारे वातावरण आणि इतर इन्फेक्शनमुळे खोकला, घशाची खवखव, कफ, सर्दीची समस्या सर्वांनाच होते. पाण्याच्या गुळण्या केल्याने शरीराला एक नाही तर अनेक फायदे मिळतात. या गुळण्या कशा कराव्यात आणि त्यामुळे कोणत्या समस्या दूर होतात ते जाणून घेवूयात…
या समस्या होतील दूर
1 घसा खवखवणे
2 तोंडातून दुर्गंधी येणे
3 सुका खोकला
4 घशातील सूज
नक्की वाचा
1) ग्रीन टी पिण्याची योग्य वेळ तुम्हाला माहित आहे का ?, जाणून घ्या
हे लक्षात ठेवा
1 कोमट पाण्यात थोडे मीठ टाकून गुळण्या करा.
2 घसा खवखवत असेल किंवा सुज आल्याने वेदना होत असतील तर पाण्यात एक चमचा मध घाला. यामुळे तोंडातील बॅक्टेरियांची वाढ रोखता येते.
3 मीठ जंतूनाशक असल्याने गरम पाण्यात मीठ घालून गुळण्या केल्याने घश्यातील सुज कमी मदत होते.
4 गुळण्या करताना कोमट पाण्यात बेकिंग सोडा घातल्याने श्वासांमधून येणारी दुर्गधी कमी होते.
5 20-30 सेकंद गुळण्या करताना पाणी तोंडात ठेवल्यानंतर पाणी बाहेर टाका. नंतर दात स्वच्छ करा.
1 Comments
Excellent
ReplyDelete