Eat Peanuts Regularly, Learn The 10 Health Benefits

नियमित शेंगदाणे (Peanuts) खाल्ल्याने यातील प्रोटीन, फायबर, खनिजे, व्हिटामिन आणि अँटीऑक्सिंडट्समुळे शरीराला अनेक फायदे होतात. सुमारे शंभर ग्राम शेंगादाण्यामध्ये ५६७ कॅलरीज असल्याने शरीराला मोठ्याप्रमाणात उर्जा मिळते. योग्यप्रमाणात शेंगदाणे खाल्ल्याने कोणते फायदे होतात ते आपण जाणून घेवूयात.

हे आहेत फायदे

१ गर्भवती स्त्रियांनी शेंगदाण्याचे नियमित सेवन केल्यास गर्भाच्या विकासासाठी मदत होते.
२ वजन नियंत्रणात राहते.
३ जेवणानंतर सुमारे ५० ग्रॅम शेंगदाणे खाल्ल्यास आरोग्य चांगले राहते. अन्न पचन चांगले होते. रक्ताची कमतरता होत नाही.
४ यातील ओमेगा ३ फॅटी अ‍ॅसिडमुळे केसांची मूळे बळकट होतात.
५ यातील फायबरमुळे शरीराला अनेक फायदे होतात.
६ शंभर ग्राम शेंगदाण्यात १ लिटर दुधाइतके प्रोटीन असतात.
७ यातील अमिनो अम्लामुळे शारीरीक वाढ चांगली होते.
८ पोटाचे आजार दूर राहतात. पोटाचा कॅन्सरला प्रतिबंध होतो.
९ यातील व्हिटॅमिन बी मुळे मेंदूचे आरोग्य चांगले राहते. मेंदूला जाणारा रक्तप्रवाह योग्य राहतो.
१० यातील व्हिटॅमिन ई मुळे पेशींचे आवरण आणि त्वचा यांचे संरक्षण होते.