Learn the ‘10’ truths, the ‘6’ myths and misconceptions about eating salt

मीठ (Salt) किती खावे, वरुन खायचे की नाही, खारवलेले पदार्थ खायचे की नाही, की मीठ खाऊच नये, याबाबत नेहमीच विविध मते आपण ऐकत असतो. मीठाबाबत अनेक गैरसमज बहुतांश लोकांच्या मनात घर करून वर्षीनुवर्षे बसलेले असतात. अमेरिकेतल्या विद्यापीठातील शास्त्रज्ञानी केलेला एक अभ्यास ब्रिटिश मेडिकल जर्नल ऑफ ओपन हार्टमध्ये प्रसिद्ध झाला आहे, यातील सत्य आपण जाणून घेणार आहोत.

हे आहेत 6 समज आणि गैरसमज

1) अन्न शिजल्यावर मीठ घालावे.
2) अन्न शिजताना मीठ घाला.
3) वजन वाढत असल्यास मीठ बंद करा
4) बीपीचा त्रास असेल तर मीठ बंदच करा.
5) पुर्वीची पानात मीठ वाढून घ्यायची रीतच बरोबर होती.
6) अन्नात चवीपुरते मीठ आवश्यक.
शास्त्रज्ञ हे सांगतात…

1) मीठ खाण्याचा आणि हार्टअटॅकचा काही संबंध नाही.
2) याचा आणि बीपीचाही काही संबंध नाही.
3) योग्य प्रमाणात मीठ खाणे शरीराला अपायकारक नाही.
4) साधारण दिवसाला 2.4 ग्रॅम मीठ खाणे शरीराला पुरेसे असते.
5) कोरिअन माणसे दिवसाला साधारण 4 ग्रॅमहून जास्त मीठ खातो. पण तरी जगात कोरिअन माणसांचे हायपरटेन्शन आणि हार्टअ‍ॅटॅकचे प्रमाण कमी आहे.
6) उलट कमी मीठ खाणारे अनेक अमेरिकन हार्टअटॅकचे बळी आहेत.
7) मीठ कमी खा, बंदच करा, बीपी वाढेल ही समजूतच चूक आहे.
8) मीठ अजिबातच न खाणे, खूपच कमी खाल्ल्याने शरीराची इन्सुलिन स्वीकारण्याची क्षमता कमी होते. डायबिटीसची शक्यता वाढते.
9) मीठ पूर्ण बंद करणे, अती कमी खाणे हे टाळा.
10) चवीपुरते मीठ हा पारंपरिक नियम लक्षात ठेवा.

(टिप : वरील सर्व समस्या आम्ही फक्त माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते.)