There may be a risk of 'this' cancer

जर पोट जास्त जड झाल्यासारखं वाटत असेल किंवा पोट फुगत असेल तर अनेकदा आपण याकडे दुर्लक्ष करतो. परंतु ही लक्षणं पॅनक्रियाटिक (Pancreas) कॅन्सरचीही असू शकतात. पचनक्रिया शरीरात दोन प्रकारे हार्मोन्स तयार करतं. ग्लूकॅगोन आणि इंसुलिन यामुळं पचनक्रिया व्यवस्थित आणि नियंत्रणात राहते. ग्लूकॅगोनमुळं शरीरातील ग्लूकोजचा स्तर वाढवण्यास मदत होते. पचनक्रियेत असामान्य पेशींची वाढ झाल्यानंतर हा आजार होतो. कारण त्यामुळं ट्युमर तयार होतो.

काय आहेत लक्षणं ?

– भूक कमी लागणं
– अचानक वजन कमी होणं
– पोटाच्या खालच्या बाजूला वेदना होणं
– उल्टी होणं
– सूज येणं
– पित्त वाढणं
– थकवा येणं
– रक्त गोठणं
– ताण तणाव
काय करावेत उपाय ?

1) धूम्रपान करू नका – जर तुम्ही धूम्रपान करत असाल तर पचनक्रियेचा कॅन्सरच नाही तर इतर अनेक प्रकारच्या आजाराचे शिकार होऊ शकता. कॅन्सरपासून दूर राहायचं असेल तर तुम्हाला अशा पदार्थांचं सेवन टाळायला हवं. जास्त मद्यपान करणंही शरीरासाठी घातक ठरू शकतं.

2) वजनावर नियंत्रण ठेवा – अनेक आजारांचं प्रमुख कारण हे लठ्ठपणा आहे. कारण बदललेली लाईफस्टाईल, अनियमित आहार यामुळं वजन वाढतं. त्यामुळं लठ्ठपणा आणि इतर आजारांपासून दूर राहण्यासाठी दूर राहण्यासाठी संतुलित आहार घेणं गरजेचं आहे.