Excessive stress increases sleep problems in children

मुलांवरील अतिताण (Hypertension) हेच यामागील मूळ कारण असल्याचे जाणकारांचे मत असून, दिवसभरात उपचारासाठी येणाऱ्या दहा मुलांमधील दोन मुलांमध्ये ही समस्या असल्याचे दिसत आहे. साधारण आठ ते तेरा वर्षांतील मुलांमध्ये अनिद्रा म्हणजे स्लीप एप्नियाची समस्या वाढत आहे. मुलांवरील अतिताण हेच यामागील मूळ कारण असल्याचे तज्ज्ञ सांगतात. बिघडलेली जीवनशैली झोपेसाठी घातक ठरत आहे. यातून लहान मुलेदेखील सुटलेली नाहीत. यामुळे लहान मुलांनाही अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहेत.

स्लीप एप्नियाच्या समस्येने मुले सर्वाधिक त्रस्त असल्याचे आढळत आहे. मुलांकडून प्रत्येक बाबतीत पालकांच्या अवास्तव अपेक्षा वाढल्याने त्यांच्यावर अतिरिक्त ताण पडू लागला आहे. त्यामुळे झोपेतही मुलांमध्ये ताण दिसून येतो. झोपेत शरीरातील हवेचे प्रमाण कमी होऊन घोरण्याचा आवाज वाढतो. त्यापुढे रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होऊन झोप होत नाही. मुलांना किमान नऊ तासांची झोप अपेक्षित असते; मात्र पुरेशी झोप न झाल्यामुळे मुलांना अनेक व्याधी होतात.

नक्की वाचा

1) ग्रीन टी पिण्याची योग्य वेळ तुम्हाला माहित आहे का ?, जाणून घ्या

तज्ज्ञ सांगतात.स्लीप एप्नियामुळे मुले झोपेत असताना गळय़ाच्या मागील भागातील सॉफ्ट टिश्यू ब्लॉकेजची स्थिती निर्माण होते. त्यामुळे मुले जोराने घोरायला लागतात. तसेच श्वास घेण्याची प्रक्रिया कमी-अधिक होते व ही स्थिती रात्रभर राहते. घोरण्याची समस्या असल्यास ते स्लीप एप्नियाच्या समस्येचे लक्षण असू शकते. मुलांची झोप कमी झाली तर एकाग्रता कमी होऊन मानसिक दबाव वाढतो. तसेच रात्री मुलांची झोप वारंवार तुटणे, दिवसभरात मुलांची वागणूक बदलणे, वारंवार संताप व्यक्त करणे, शाळेतील वर्तणूक बदलणे ही या आजाराची लक्षणे आहेत.

स्पर्धा आणि पालकांच्या अवास्तव अपेक्षांमुळे ताण निर्माण होऊन मुलांच्या मानसिकतेवर आघात होतो. मुले नेहमीच अतितणावाखाली वावरतात. टीव्ही पाहण्याचे प्रमाण वाढून मैदानी खेळांचे प्रमाण कमी होत आहे. आठ वर्षांपुढील मुलांमध्ये ही समस्या अधिक दिसून येते. कमी वयात शाळेत टाकणे, वय न पाहता अनेक अपेक्षा करणे, यामुळे ही समस्या निर्माण होते.