
आरोग्य (Health) आणि झोप यांचा खुप निकटचा संबंध आहे. कमी आणि अशांत झोप सतत मिळाल्यास त्याचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होतो. म्हणून पूर्ण आणि शांत झोप अतिशय आवश्यक असते. शिवाय झोपताना काही नियम पाळण्याची गरज असते, जेणेकरून शांत झोप मिळू शकते. जर तुम्ही अंगावर पांघरून घेऊन झोपलात तर त्याचे काही फायदे तुम्हाला होऊ शकतात. अंगावर पांघरून घेऊन झोपण्याचे फायदे आणि झोपेविषयी महत्वाची माहिती आपण जाणून घेवूयात…
अंगावर पांघरून घेण्याचे फायदे
1 स्लीप मेडिसीन अँड डिर्सोर्डरमध्ये नमुद केल्यानुसार, अंगावर पांघरूण घेऊन झोपल्यानं झोप चांगली येते.
2 अमेरिकन जर्नल ऑफ ऑक्यूपेशनल थेरेपीमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या शोधानुसार अंगावर पांघरूण घेऊन झोपल्याने चिंता आणि अनिद्रेने पिडित असलेल्या लोकांना शांत झोप लागते.
3 अंगावर पांरूण घेऊन झोपल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले राहते.
4 महत्वाचं म्हणजे रात्रीच्यावेळी सुरक्षित वाटण्याासाठी पाांघरूण वापरणं गरजेचं आहे. मात्र, पांघरूणामुळे श्वास घ्यायला त्रास होणार नाही, असे पांघरूण घ्या..
नक्की वाचा
1) आरोग्यासाठी झोपण्याची स्थितीही ठरते महत्वाची
2) Weight Loss : सकाळी की संध्याकाळी ? कोणत्या वेळी व्यायाम केल्यानं वेगानं घटतं वजन
हे माहित आहे का
आपण झोपतो तेव्हा शरीराचे तापमान कमी असते. झोपण्याच्या एक तास आधीपासून ही प्रक्रिया सुरू होते. या प्रक्रियेमुळे शरीर तापमान नियंत्रणात ठेवण्याची समस्या कमी झालेली असते. व्यक्ती रॅपिड आय मुव्हमेंटमध्येमध्ये पोहोचलेली असते. म्हणजेच स्लीप सायकल सुरू झालेली असते. डोळे बंद करून सौम्य गतीने बुबुळं इकडे तिकडे फिरत असतात. अशावेळी पांघरूण किंवा चादर व्यक्तीला रात्रभर उब देण्यासाठी आवश्यक ठरते. त्यामुळे शरीर कापत नाही. याशिवाय रात्री झोपताना शरीर झाकून झोपणं गरजेचं आहे. सर्केडियन हे 24 तासांचे चक्र असते. ज्यामुळे रासायनिक, शारीरिक प्रक्रियांनी नियंत्रित करून झोपेचे चक्र प्रभावित होते. त्यामुळे शरीराला कधी झोपायला हवं. कधी उठायला हवं याची जाणीव होते.
0 Comments