Is soap more effective than hand soap or sanitizer?

हात स्वच्छ (clean) ठेवल्यास अनेक आजारांना आपोआपच प्रतिबंध होतो. म्हणूनच घरातील मुलांना नेहमी हात स्वच्छ ठेवण्याचा सल्ला दिला जातो. जेवणापूर्वी हात स्वच्छ धुवण्यास सांगितले जाते. तसेच शौचावरून आल्यानंतर साबणाने हात स्वच्छ केले जातात. हात स्वच्छ करण्यासाठी सर्रास साबणाचा वापर केला जातो. मात्र, अलिकडे हाताच्या स्वच्छतेसाठी सॅनिटायझरचा वापर मोठ्याप्रमाणात केला जातो. लहान मोठे सर्वचजण सॅनिटायझरचा वापर करतात. ऑफिस, शाळेतदेखील हाताच्या स्वच्छतेसाठी सॅनिटायझर सोबत ठेवले जाते. मात्र सतत सॅनिटायझरचा वापर करण्याऐवजी साबणाचा वापर करणे कधीही चांगलेच.

सॅनिटायझरमध्ये जास्तीत जास्त ६० टक्के अल्कोहोल असते. जे कीटणू पूर्णपणे मारण्यासाठी सक्षम नसते. पुन्हा पुन्हा हात स्वच्छ करण्यासाठी सॅनिटायझरचा वापर केल्याने बॅक्टेरिया सॅनिटायझर प्रति प्रतिरोधक होतात. त्यामुळे गरज नसेल तेव्हा सॅनिटायझरऐवजी साबण आणि पाण्याने हात धुवावे. सॅनिटायझरने काही वेळेसाठीच कीटाणू मारले जातात. तर साबण आणि पाण्याने हात धुतल्याने जास्त हात जास्त वेळेसाठी स्वच्छ आणि किटाणूमुक्त राहतात. सॅनिटायझर वापरण्याऐवजी २० सेकंदात साबणाने हात चांगले स्वच्छ होतात. साबणाने हात धुतल्यास हातांवरील पेशी त्वचेच्या आत जाऊन व्हायरस आणि बॅक्टेरिया नष्ट करतात. हात स्वच्छ करण्यासाठी अ‍ँटीबॅक्टेरिअल साबणाचा वापर करणे गरजेचे नाही. हात स्वच्छ करण्यासाठी कोणत्याही सामान्य साबण उपयोगी ठरू शकतो.
अ‍ँटीबॅक्टेरिअल साबणाचा वापर केवळ आजारी लोकांसाठी किंवा अशा रूग्णांसाठी झाला पाहिजे ज्यांची इम्यूनिटी कमजोर असेल. पाळीव प्राणी ज्यांच्याकडे आहे त्यांनी प्राण्यांना स्पर्श केल्यावर अ‍ँटीबॅक्टेरिअल साबणाचा वापर करावा. परंतु, अ‍ँटीबॅक्टेरिअल प्रॉडक्ट्सचा वापर कमीत कमी करावा. कारण त्याचा जास्त वापर केल्यास त्वचेतील चांगले बॅक्टेरियाही नष्ट होऊ शकतात. ओलाव्यामुळे बॅक्टेरिया वाढतात. त्यामुळे दिवसातून कमीत कमी ६ वेळा हात स्वच्छ करावे. खाण्याआधी आणि टॉयलेटचा वापर केल्यावर हँडवॉश करणेही तेवढेच आवश्यक आहे.