Simple Ayurvedic remedies to keep you always young and healthy

चुकीची जीवनशैली, अयोग्य आहार, मानसिक ताणतणाव (Stress) यामुळे तरूणपणात अनेकजण आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. अशा व्यक्तींना विविध आजार होऊ शकतात. थकवा, सांधेदुखी, केस अकाली पांढरे होणे, अशक्तपणा, दृष्टीदोष अशा समस्या होऊ शकतात. हा धोका टाळण्यासाठी काही आयुर्वेदिक उपाय असून ते केल्यास निरोगी राहणे सहज शक्य आहे. चिरतरूण राहण्यासाठी असलेले आयुर्वेदिक उपाय आपण जाणून घेणार आहोत.

हे उपाय करा

हे मिश्रण नियमित घ्या

१ आवळ्याचा रस, गायीचे तुप, मध व बारीक खडीसाखर प्रत्येकी १५-१५ ग्रॅम घेऊन मिश्रण तयार करा. सकाळी उपाशी पोटी या मिश्रीनाचे सेवन करावे. चुर्ण खाल्ल्यावर दोन तासापर्यंत काहीच खाऊ नये. दररोज याचे सेवन केल्यास अनेक प्रकारच्या रोगांपासून तुम्ही दूर राहू शकता. हा उपाय तारुण्यावस्था दिर्घकाळ टिकवण्यासाठी लाभदायक ठरतो.

नक्की वाचा

1) ग्रीन टी पिण्याची योग्य वेळ तुम्हाला माहित आहे का ?, जाणून घ्या

संतुलित आहार

संतुलित आहार घ्यावा. तो पचण्यास हलका असावा. यामध्ये व्हिटॅमिन, प्रोटीन आणि खनिज तत्व असावेत. बाहेरचे खाद्य, तेल, तुप, आणि गोड पदार्थ खाऊ नका. दररोज डाळिंबाचे सेवन करा. यामुळे अकाली वृद्धत्व येत नाही. तारूण्यावस्था दिर्घकाळ टिकते.

तणाव टाळा

मानसिक ताण टाळण्याचा प्रयत्न करा. मित्रांसोबत वेळ घालवा. संगीत ऐका, चांगली पुस्तके वाचा, यामुळे मानसिक ताण दूर होईल.

हे लक्षात ठेवा

* दररोज झोपे वेळेवर घ्या. झोप कमी होण्याने अनेक आजार होतात. दररोज कमीत कमी ६ ते ८ घंटे झोपणे आवश्यक आहे.
* सकाळी लवकर उठायला हवे आणि रात्री योग्य वेळी झोपयला हवे.
* दिवसा अथवा संध्याकाळी झोपू नका.
* दररोज सकाळी व्यायाम करा. योगासनामुळे अधिक काळ तरूण राहता येते.