These are the causes of red eyes

डोळ्यांच्या कंजेक्टिवायटीस  म्हणजेच
लाल डोळे (red eye) आजाराची समस्या पावसाळ्यात नेहमीच दिसून येते. तसेच डोळे येण्याची समस्या सुद्धा होते. कंजेक्टिवायटीस आजारात डोळ्याच्या बुबुळांचा भाग सोडून आजूबाजूच्या भागात एक थर तयार होतो. त्याला कंजेक्टिवा असं म्हणतात. हा आजार बॅक्टेरिअल, व्हायरल संक्रमण किंवा अ‍ॅलर्जीमुळे होतो. डोळ्यांना सूज येते. हे इन्फेक्शन घातक नाही. धूळ, घाण, किटाणू यांमुळे हा आजार उद्भवतो. पण वेळेवर डॉक्टरांचा सल्ला न घेतल्यास समस्या वाढू शकते. वातावरणातील बदलांमुळे लाल डोळे (red eye) येतात. डोळे येऊ नयेत म्हणून कोणती काळजी घ्यावी ते जाणून घेवूयात…

ही आहेत लक्षणे

1) डोळे लाल होणे
2) डोळयांमध्ये जळजळ होणे
3) सूज येणे
4) खाज येऊन डोळ्यातून पाणी येणे

नक्की वाचा

1) ग्रीन टी पिण्याची योग्य वेळ तुम्हाला माहित आहे का ?, जाणून घ्या

अशी घ्या काळजी

1) हात नेहमी स्वच्छ ठेवा, अस्वच्छ हातांनी डोळ्यांना स्पर्श करू नका.
2) रुमालाने डोळे पूसत राहा, तसेच पाण्याने स्वच्छ धुवा
3) आजारी व्यक्तीच्या कपड्यांचा वापर करू नका
4) घरातून बाहेर पडताना चष्म्याचा वापर करा.


टीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अ‍ॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत.